
Kharif Season : सांगली ः जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी ८३ हजार २५३ हेक्टरवर झाली आहे. गेले पंधरा दिवस पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. परंतु उशिराने पडलेल्या पावसाचा फटका कडधान्याच्या पेरणीवर झाला. परिणामी कडधान्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली.
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर आहे. यंदाच्या पेरणीच्या कालावधीतच पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी विलंब झाला आहे. जुलै अखेरीस ८३ हजार २५३ हेक्टरवर म्हणजे ३२ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हलक्या, मध्यम पावसाची हजेरी लावली. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली.
जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठे महांकाळ, जत आणि खानापूर तालुक्यांत मूग, उडीद, तूर यासह अन्य कडधान्यांची पेरणी केली जाते. जिल्ह्यात मुगाचे सरासरी क्षेत्र ७५९२ हेक्टर असून ८९१ हेक्टर उडदाचे सरासरी क्षेत्र १४ हजार ९६२ हेक्टर असून उडदाची २ हजार ०८७ हेक्टवर पेरा झाला आहे. तर तुरीचे सरासरी क्षेत्र ११ हजार १८४ हेक्टर असून ३५५२ हेक्टरवर पेरणी झाली. परंतु मॉन्सूनपूर्व पावसाने दडी मारल्याने या भागातील शेतकरी कडधान्य पेरणीसाठी पुढे आलेच नाहीत. त्यामुळे कडधान्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय पेरणी
झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र
मिरज ३०४५
जत १३१६४
खानापूर ५४१६
वाळवा १७९८८
तासगाव ७७००
शिराळा १०७५०
आटपाडी ५३६१
कवठे महांकाळ ३६९५
पलूस २९९३
कडेगाव ४१४५
एकूण ८३२५३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.