Amravati News : टाकरखेड्यातील महिलांचा निसर्गसंवर्धनाचा वसा

Vatpournima : वटपोर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून विवाहितांकडून पतीच्या दीर्घाआयुष्याची प्रार्थना केली जाते.
Amravati News
Amravati NewsAgrowon
Published on
Updated on

Amravati News : वटपोर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून विवाहितांकडून पतीच्या दीर्घाआयुष्याची प्रार्थना केली जाते. मात्र टाकरखेडा संभू येथील प्रयोगशील महिला शेतकरी पोर्णिमा सवाई यांच्या नेतृत्वात महिलांनी गेल्या काही वर्षांपासून या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा उद्देश साधण्यावर भर दिला आहे.

यंदाच्या वर्षी महिलांनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने सीडबॉलच्या माध्यमातून वनसंवर्धनाचा निर्णय घेतला आहे.

Amravati News
Farmers Protest : हमीभावासाठी शेतकरी आक्रमक ; दिल्ली-चंदीगड महामार्ग रोखला

टाकरखेडा संभू गावात दरवर्षी वटपोर्णिमेला वडाची पूजाच नाही तर पर्यावरण संवर्धनविषयक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात सातत्य राखण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी यानिमित्ताने वृक्षारोपण त्यानंतर गेल्या वर्षी विधवा महिलांना सौभाग्याचे दान देण्यात आले.

या वर्षी मात्र वटपोर्णिमा हटके साजरी करण्याच्या उद्देशाने सीडबॉल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता वर्षभर फळांच्या बिया जमा करून त्यापासून माती व बियांचा वापर करीत सीडबॉल तयार होतो. नंतर पाऊस आल्यानंतर तो वनक्षेत्रात फेकण्याचे नियोजन आहे.

टाकरखेडा-आष्टी मार्गावर या माध्यमातून फळझाडांच्या लागवड व संवर्धनाला प्रोत्साहन देण्याचा मानस महिला मंडळाचा आहे. भविष्यात या झाडांची फळे गावातील मुलांना चाखण्यास मिळतील, पुढे याच फळांची विक्री करून रोजगार निर्मितीचाही उद्देश साधता येणार आहे.

या उपक्रमात पोर्णिमा सवाई, पूजा शेंडे, सुलोचना पिंगळे, उज्ज्वला पिंगळे, सरस्वती पिंगळे, निर्मला कानतोडे, रेखा पटले, कुसूम मेश्राम, सुशीला लांडे, सुनीता कातोरे, सुनीता शेंडे, राजकन्या गणोरकर, सुलोचना झगेकार, पुष्पा बोबडे, जया पाटील, कल्याणी सवाई, स्वाती सवाई, इंदिराबाई पिंगळे, संगीता नाचणकर आदी महिला सहभागी झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com