Sugar Rate : जागतिक बाजारात साखरेचे दर चढेच राहण्याची शक्यता

ब्राझीलमध्ये यंदा ७.६ टक्के साखर वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ब्राझीलमध्ये इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले.
Sugar Export
Sugar ExportAgrowon
Published on
Updated on

Sugar Market Rate कोल्हापूर : ब्राझील, थायलंड मध्ये साखरेचे उत्पादन (Sugar Production) वाढण्याची शक्यता असली तरी जगातील अन्य देशांमध्ये मात्र साखरेच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे. त्यामुळे यंदा जागतिक बाजारात साखरेचे दर (Sugar Rate) चढेच राहतील, अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

ब्राझीलमध्ये यंदा ७.६ टक्के साखर वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ब्राझीलमध्ये इथेनॉलचे उत्पादन (Ethanol Production) मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे साखर उत्पादनात घट झाली.

याचा फायदा गेल्या दोन वर्षांमध्ये भारताला मोठ्या प्रमाणात झाला. पण गेल्या वर्षी इथेनॉलच्या दरात चढ-उतार राहिल्याने येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामात ब्राझीलच्या साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाला प्राधान्य देण्याचे ठरविल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन वाढेल, अशी शक्यता ‘फीच सोल्यूशन्स कंट्री रिस्क अँड इंडस्ट्री रिसर्च' ने व्यक्त केली आहे.

Sugar Export
Sugar Export : कारखान्यांकडून ३६ लाख टन साखर निर्यातीसाठी रवाना

सध्या तरी जागतिक बाजारात अपेक्षेपेक्षा साखरेचा साठा कमी आहे. ब्राझील व थायलंड वगळता अन्य प्रमुख देशांमध्ये साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. ब्राझील व थायलंडमध्ये साखरेचे उत्पादन वाढणार असले तरी ते वाढीचे प्रमाण अत्यल्प असेल, असे साखर उद्योगातील जाणकार सांगतात.

लंडन स्थित ‘ड्रायव्हरसी फाईड ग्लोबल फायनान्शिअल सर्विस फॉर्म’ या संस्थेने जागतिक बाजारपेठेत यंदाही साखरेची चणचण राहील, असे सांगितले आहे.

भारतासह युरोपियन देशांमध्ये साखरेचे उत्पादन कमी आहे. मागणी कायम असल्याने फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात गेल्या सहा वर्षातील वाढीचा उच्चांक गाठला होता.

Sugar Export
Sugar Export : कारखान्यांकडून निर्यातीसाठी ३६ लाख टन साखर रवाना

साखरेची चणचण भासण्याची शक्यता

ब्राझीलमध्ये सात ते आठ टक्के साखरेचे उत्पादन वाढणार असले तरी भारतासारख्या गेल्यावर्षी अव्वल नंबर ठरलेल्या देशामध्ये निर्यातीवर निर्बंध आणण्यात आले.

त्यामुळे भारतातून जागतिक बाजारपेठेत अत्यंत कमी प्रमाणात साखर येत्या काही महिन्यात जाईल, अशी शक्यता आहे.

जरी ब्राझीलचे साखर उत्पादन वाढले तरीही भारतामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेची चणचणच राहील, असा अंदाज आहे.

भारताचा दबदबा कमी होणार?

भारत सरकारने निर्यातीवर निर्बंध घातल्याने जागतिक बाजारात तातडीने साखर येईल, अशी अपेक्षा नसल्याचे जागतिक बाजारपेठेतील व्यापारी सूत्रांनी सांगितले. भारतातून गेल्यावर्षी शंभर लाख टनांहून अधिक साखरनिर्यात झाली होती.

यंदा भारतातून घटलेल्या साखरेची जागा ब्राझील व थायलंडमधील कारखानदार घेण्याची शक्यता आहे. भारतात घटत्या साखर उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार यंदा आणखी निर्यातीला किती परवानगी देईल, याबाबत साशंकता आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी जितका दबदबा भारतीय साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात होता तितका धबधबा यंदा राहणार नाही, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com