Catch The Rain: ‘जलशक्ती’तील कामांची केंद्रीय पथकाकडून पाहणी

केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव राहुल मलिक व तंत्र अधिकारी डॉ. एस. आर. स्वामी या दोन सदस्यीय तज्ज्ञ पथकाने (Central team) ५ ते ७ जुलै २०२२ कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणांना भेटी दिल्या.
Catch The Rain
Catch The RainAgrowon
Published on
Updated on

नगरः केंद्र सरकारच्या ‘जलशक्ती’ अभियानातील ‘कॅच द रेन’ उपक्रमांतर्गत केंद्रीय पथकाने (Central team) तीन दिवसीय दौऱ्यात जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची आढावा बैठक घेण्यात आली. राळेगणसिद्धी (Ralegan Siddhi), हिवरेबाजारसोबत (Hivare Bajar) इतर गावांना भेटी देत जलसंधारणाची कामे जाणून घेतली.

केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव राहुल मलिक व तंत्र अधिकारी डॉ. एस. आर. स्वामी या दोन सदस्यीय तज्ज्ञ पथकाने (Central team) ५ ते ७ जुलै २०२२ कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणांना भेटी दिल्या. केंद्रीय पथकातील सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ५ जुलैला बैठक घेण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, पथकाने पारनेरमधील ‘हंगा’ पाझर तलावाच्या दुरुस्ती कामास भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शनपर सूचना दिल्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांची राळेगणसिद्धी येथे सदिच्छा भेट घेऊन गावकऱ्यांकडून लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या विविध कामांची माहिती जाणून घेतली.

केंद्रीय पथकाने ६ जुलै रोजी हिवरेबाजार (Hivare Bajar) या आदर्श गावास भेट दिली. पोपटराव पवार यांनी गावामध्ये चालू असलेल्या जलसंधारण विषयक कामांची माहिती दिली. वाळकी येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या सोयाबीन लागवड, दरेवाडीतील प्रसिद्ध हत्ती बारव येथे नगर ट्रेकर्स या संस्थेने केलेले काम, तसेच कोल्हेवाडी येथील सिमेंट नालाबांधाची पथकाने पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com