Tomato Market : दरातील तेजीमुळे टोमॅटो पिकावर ‘सीसीटीव्ही’ची नजर

CCTV Surveillance On Tomato Crop : निफाड तालुक्यातही यापूर्वी कसबे सुकेने परिसरात काढणीयोग्य द्राक्षमाल चोरट्यांनी लांबविल्याच्या घटना घडल्या. आता टोमॅटोच्या दरात तेजी आहे.
Tomato Crop
Tomato CropAgrowon

Nashik News : जुलैमध्ये मालेगाव तालुक्यात तीन शेतकऱ्यांचा काढणी योग्य लाखो रुपयांचा डाळिंब चोरी गेला. निफाड तालुक्यातही यापूर्वी कसबे सुकेने परिसरात काढणीयोग्य द्राक्षमाल चोरट्यांनी लांबविल्याच्या घटना घडल्या.

आता टोमॅटोच्या दरात तेजी आहे. त्यामुळे प्रतिकिलोला १०० रुपये दर मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतात सीसीटीव्ही लावले आहेत.

Tomato Crop
Tomato Rate : टोमॅटोच्या परिस्थितीला सरकारचाही हातभार

शेतीमालाच्या दरात सुधारणा नसल्याने टोमॅटो उत्पादकांना साधा उत्पादन खर्चही वसूल झालेला नव्हता. मात्र लागवडी घटल्याने मालाची आवक कमी होत आहे. मागणी कायम असल्याने चालूवर्षी टोमॅटोने शेतकऱ्यांना दराची साथ दिली. मात्र अगदी थोड्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळत आहे.

Tomato Crop
Tomato Rate : सरकार उठलं टोमॅटो उत्पादकांच्या मुळावर

सध्या अगदी थोड्याफार शेतकऱ्यांकडे टोमॅटो पीक आहे. त्यातच ग्रामीण भागातील काही शेतकरी गावात राहतात. तर काही शेतकरी मळ्यात राहतात. काही शेतकऱ्यांची घरे व शेत यांचे अंतरही लांब आहे. त्यामुळे शेतीमालाचे संरक्षण करणे ही बाब अडचणीची ठरते.

त्यामुळे तंत्रज्ञानाचा आधार घेऊन कोकणगाव (ता. निफाड) येथील शेतकरी अब्दुलगनी सय्यद यांनी तीन एकर टोमॅटोच्या पिकात तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. काही ठिकणी अज्ञात व्यक्तींकडून टोमॅटोचे नुकसान व चोरी झाली आहे. अशा घटना होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे सय्यद कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्याचा मळा घरापासून दूरवर आहे. त्यामुळे तसेच सध्या टोमॅटोला दर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे कॅमेरे शेतकऱ्यांनी बसविले आहेत. यापूर्वी टोमॅटोला भाव नव्हता. मात्र आता भाव आल्याने शेतकरी टोमॅटो पिकाची काळजी घेत आहेत.
- तुकाराम पवार, पोलिस पाटील, कोकणगाव,. ता.निफाड, जि. नाशिक.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com