Tomato Rate : सरकार उठलं टोमॅटो उत्पादकांच्या मुळावर

Team Agrowon

टोमॅटोचे भाव तेजीतच

सरकारने प्रयत्न करूनही टोमॅटोचे भाव तेजीतच आहेत. आजही काही शहरांमध्ये टोमॅटोने २०० रुपयांचा टप्पा पार केला होता.

Tomato | Agrowon

टोमॅटो विक्री सुरु

तर घाऊक बाजारातील भावही काही ठिकाणी १०० रुपयांच्या पुढे पोचला. सरकारने काही भागांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटो विक्री सुरु केली.

Tomato | Agrowon

दरवाढीला आधारच

पण त्यामुळे दरवाढीला आधारच मिळाला. पण सध्याच्या स्थितीला सरकारचं धोरणही जबाबदार असल्याचं शेतकरी आणि व्यापारी सांगतात.

Tomato | Agrowon

बाराही महीने टोमॅटोची लागवड

सरकारच्या नोंदीनुसार टोमॅटो खरिप आणि रब्बी हंगामात घेतला जातो. पण शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बाराही महीने टोमॅटोची लागवड केली जाते.

Tomato | Agrowon

टोमॅटोची लागवड

सरकारच्या मते देशात २०२२-२३ मध्ये जवळपास ९ लाख हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली. तर उत्पादन २०६ लाख टनांवर पोचले.  

Tomato | Agrowon

द्राक्षापेक्षाही संवेदनशील

टोमॅटो पाहीलं तर द्राक्षापेक्षाही संवेदनशील आणि नाशवंत पीक. टोमॅटोच्या खरिपलागवडी आता पूर्ण झाल्या. ७० ते ८० दिवसांमध्ये माल सुरु होतो.

Tomato | Agrowon
Ruturaj patil | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा