Maharashtra Karnataka Border Issue : सीमावादावर कर्नाटक ताठर; कर्नाटकात जाणारी बससेवा बंद

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेसवर दगडफेक केल्यानंतर आणि कर्नाटकच्या बसला पुण्यातील स्वारगेट येथे काळे फासल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
Maharashtra Karanataka Border
Maharashtra Karanataka BorderAgrowon

मुंबई : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेसवर (Maharashtra Karnataka Bus) दगडफेक केल्यानंतर आणि कर्नाटकच्या बसला पुण्यातील स्वारगेट येथे काळे फासल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या बाबतची माहिती बोम्मई यांनी ट्विट करून दिली. मात्र सीमाभागासंदर्भात आमची भूमिका कायम असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

दरम्यान, कर्नाटक सरकारने कोल्हापूरजवळील कोगनोळी नाका येथे प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना काही ठिकाणी ताब्यात घेण्यात आले असून, मंगळवारी (ता. ६) महाराष्ट्राच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली.

Maharashtra Karanataka Border
Maharashtra Border : कर्नाटकच्या दाव्यानंतर ‘तुबची’चे पाणी महाराष्ट्रात

यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असे विधान केले, तसेच कर्नाटकची अशीच दडपशाही सुरू राहिल्यास आम्ही बेळगावात येऊ, असा असा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात जाण्यास तयार असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी पवित्रा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हालचाल करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी संपर्क साधला. यासंदर्भात बोम्मई यांनी ट्विट करून माहिती दिली.

Maharashtra Karanataka Border
Maharashtra-Gujarat border : सुरगाणा तालुक्यातील गावे गुजरातमध्ये घ्या

‘‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझी फोनवर चर्चा झाली. या वेळी दोनही राज्यांत शांतता, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली आणि आमच्यात एकमत झाले आहे. तसेच दोनही राज्यांतील जनतेमध्ये सुरुवातीपासूनच प्रेम आणि बंधुत्वाची भावना राहिली आहे. लोकांचे आपापसांत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आमच्यात कर्नाटकच्या सीमाप्रश्‍नावरून कोणतेही दुमत नाही. आम्ही कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात लढणार आहोत,’’ असे बोम्मईंनी स्पष्ट केले.

बसला फासले काळे

कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि बसेसचे नुकसान टाळण्यासाठी बससेवा बंदचा निर्णय घेण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. पोलिसांशी चर्चा करून बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक घटना घडली. या घटनेनंतर पुणे शहरातील स्वारगेट परिसरात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेसला काळे फासले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com