Chemical Fertilizer : परभणी-हिंगोलीत एक लाख टनावर रासायनिक खते शिल्लक

Fertilizer Stock : परभणी -हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या विविध ग्रेडचा १ लाख ९८ हजार ७० टन खतसाठा मंजूर आहे.
Fertilizer Shortage
Fertilizer ShortageAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी -हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या विविध ग्रेडचा १ लाख ९८ हजार ७० टन खतसाठा मंजूर आहे. या दोन जिल्ह्यांत एप्रिल महिन्यात ५२ हजार २९० टन खतांचा पुरवठा झाला.

मार्च अखेर ८८ हजार २६८ टन खते शिल्लक होती. एप्रिल अखेर २६ हजार ३५२ टन खतांची विक्री झाली. त्यानंतर १ लाख १४ हजार २०५ टन खते शिल्लक होती, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर ७३ हजार २०० टन आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध ग्रेडच्या १ लाख ६४ हजार १५० टन खतांची मागणी केली होती.

परंतु कृषी आयुक्तालयाने १ लाख २० हजार ४६० टन खतसाठा मंजूर केला. त्यात युरिया ३३ हजार ४९० टन, सुपर फॉस्फेट १६ हजार ३०० टन, पोटॅश ४ हजार ३४० टन, डीएपी १९ हजार ७४० टन, एनपीके संयुक्त खते ४६ हजार ५९० टन या खतांचा समावेश आहे.

Fertilizer Shortage
Parbhani News : बोलीभाषांचे शास्त्र निर्माण व्हावे : रवींद्र इंगळे

एप्रिल अखेर १९ हजार २७० टन खतसाठा मंजूर आहे. मार्चअखेर ५५ हजार ५८६ टन खतसाठा शिल्लक होता. ता. १ एप्रिलपासून ३३ हजार ६६५ टन खतांचा पुरवठा झाला. त्यामुळे एकूण ८९ हजार २५१ टन खते उपलब्ध होती. एप्रिल अखेर २१ हजार ३४९ टन खतांची विक्री झाली. विविध ग्रेडची ६७ हजार ९०२ टन खते शिल्लक होती.

त्यात युरिया १२ हजार ३०४ टन, सुपर फॉस्फेट ११ हजार ८०६ टन, पोटॅश १३१ टन, डीएपी ११ हजार ६३९ टन, एनपीके ३२ हजार २२ टन यांचा समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यातील साठा असा..

हिंगोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर ८१ हजार ५६९ टन आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध ग्रेडच्या ९५ हजार ५६९ टन खतांची मागणी केली होती. परंतु ७७ हजार ६१० टन खतसाठा मंजूर केला. त्यात युरिया १६ हजार १५१ टन, सुपर फॉस्फेट १५ हजार ४३५ टन, पोटॅश ४ हजार ३०० टन, डीएपी १२ हजार ९३९ टन, एनपीके संयुक्त खते २८ हजार ७१९ टन, अमोनिअम सल्फेट ५० टन या खतांचा समावेश आहे.

एप्रिल अखेर १० हजार १३४ टन खतसाठा मंजूर आहे. मार्च अखेर ३२ हजार ६८२ टन खतसाठा शिल्लक होता. ता. १ एप्रिलपासून १८ हजार ६२५ टन खतांचा पुरवठा झाला. त्यामुळे एकूण ८९ हजार २५१ टन खते उपलब्ध होती.

ता. २७ एप्रिलअखेर ५ हजार ३ टन खतांची विक्री झाली. त्यानंतर विविध ग्रेडची ४६ हजार ३०३ टन खते शिल्लक होती. त्यात युरिया ६ हजार ४२४ टन, सुपर फॉस्फेट १३ हजार २६८ टन, पोटॅश ३२२ टन, डीएपी ६ हजार ६४० टन, एनपीके १९ हजार २६८ टन या खतांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com