Buffalo Milk Rate : म्हशीच्या दुधाला लिटरला ९८.५९ रुपयांचा दर मिळाला

Milk Rate : या तरुण शेतकऱ्याच्या म्हशीच्या दुधाला दूध संकलन केंद्रावर प्रतिलिटरला ९८.५९ असा उच्चांकी दर मिळाला आणि आनंदाने भारून गेलेल्या पठ्ठ्याने म्हशीला रंगवून, पेढे भरवून तिचा सत्कारच केला आणि तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला.
Buffalo Milk Rate
Buffalo Milk RateAgrowon
Published on
Updated on

Solapur News : शेतकऱ्यांसारखी ‘दानत’ कोणाकडेच नसते. वावरभर विस्कटलेल्या पैशाचे आणि श्रमाचे मोल कोणीतरी त्रयस्थ व्यापारी करून टाकतो. तेजीपेक्षा मंदीतच कायम सापडणारा. तरीसुद्धा यशाची हलकीशी झुळूकही आपल्या पदरात पाडणाऱ्याचे ऋण तो विसरत नाही.

असाच मोडनिंब (ता. माढा) येथील तरुण दूध उत्पादक शेतकरी स्वप्नील सत्यवान शिंदे. या तरुण शेतकऱ्याच्या म्हशीच्या दुधाला दूध संकलन केंद्रावर प्रतिलिटरला ९८.५९ असा उच्चांकी दर मिळाला आणि आनंदाने भारून गेलेल्या पठ्ठ्याने म्हशीला रंगवून, पेढे भरवून तिचा सत्कारच केला आणि तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला.

स्वप्नील हा तरुण शेतकरी. घरी वृद्ध आई-वडील व एक भाऊ. स्वतःची केवळ चार एकर शेती. बेभरवशाच्या शेतीला जोडधंदा असावा म्हणून स्वप्नीलने मुऱ्हा जातीच्या दोन म्हशी सांभाळल्या. मोडनिंब येथील ‘अमूल’च्या दूध संकलन केंद्रावर स्वप्नील दररोज दूध पाठवतो. प्रतवारीप्रमाणे दुधाचा दर असल्याने त्याच्या म्हशीच्या दुधाला ९८.५९ प्रति लिटर दर मिळाला.

Buffalo Milk Rate
Milk Rate : दुधाचे ‘रिटर्न दर’ही वाढविले!

या आनंदाच्या भरात स्वप्नीलने आपल्या म्हशीला रंगीबेरंगी फुगे लावून, पेढा भरवून कौतुक केले आणि कुटुंबासमवेत आनंद साजरा केला. गोठ्यातील मुक्या जनावराचा स्वप्नीलने केलेला हा ‘सत्कार समारंभ’ येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कौतुकाचा विषय झाला आहे.

Buffalo Milk Rate
Milk Rate : दूध दरवाढ धोरणामुळे दूध उत्पादकांचा तोटाच

मोडनिंबमधील दोन शेतकऱ्यांना म्हशीच्या दुधासाठी ९८.५९ रुपये प्रति लिटर दर मिळाला आहे. स्वप्नील सत्यवान शिंदे व महादेव जाडकर या दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधासाठी हा दर मिळाला. १२ फॅट व ९.९ एस.एन.एफ. दुधाची प्रतवारी मिळाल्याने, त्यांना हा दर मिळाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच्या म्हशीच्या प्रेमापोटी हा आनंद अशा पद्धतीने साजरा केला.

-प्रथमेश शिंदे (चेअरमन, अमूल दूध संकलन केंद्र, मोडनिंब)

जनावरांना सकस आहारासोबत मिनरल्स मिक्श्‍चर व लिक्विड कॅल्शिअम दिल्यास फॅट व एसएनएफ वाढण्यास मदत होते, यासोबतच गोचीड व जंतनिर्मूलन केल्यास जनावराचे शारीरिक आरोग्य चांगले राहते आणि कोणतेही दुष्परिणाम न होता उच्च प्रतीचे दूध उत्पादन घेता येते.

- डॉ. कैलास कच्छवे, पशुधन विकास अधिकारी, मोडनिंब

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com