Modern Technology : शेतकऱ्यांपर्यंत नवतंत्रज्ञान पोचवा

Agriculture News : उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञान, वाण शेतकऱ्यांपर्यंत नेण्याची गरज आहे. शासनाने नॅनो युरिया वापरास प्राधान्य दिले आहे.
Akola News
Akola News Agrowon

Akola News : उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञान, वाण शेतकऱ्यांपर्यंत नेण्याची गरज आहे. शासनाने नॅनो युरिया वापरास प्राधान्य दिले आहे. या युरियाचे फायदेही अधिक असल्याने विद्यापीठ शास्त्रज्ञ, कृषी विभागाने त्याचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शुक्रवारी (ता. १९) आयोजित खरीप पूर्व कृषी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. कार्यक्रमाला कार्यकारी परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विठ्ठल सरप, हेमलताताई अंधारे, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन कलंत्रे, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, शेतकरी प्रतिनिधी श्रीकृष्ण ठोंबरे उपस्थित होती.

Akola News
Kharif Sowing : एक लाख ९२ हजार हेक्टरवर होणार पेरणी

सभागृहात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासह विद्यापीठाचे विविध विभागप्रमुख होते. आमदार सावरकर म्हणाले, की उत्पादकता कमी असल्याने तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. हरभरा, कपाशी, सोयाबीन पिकात एचटीबीटीचे प्रयोग सुरू व्हायला हवेत. विद्यापीठाने तालुकास्तरावर खरीप बैठका घ्याव्यात.

या मेळाव्यात कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती दिली. हवामानशास्त्र विभागाचे सहायक प्रा. अनिल कल्याणकर यांनी मॉन्सून अंदाजाची माहिती दिली. डॉ. संजिवकुमार सलामे यांनी सूत्रसंचालन केले.

Akola News
Kharif Sowing: पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताना काय काळजी घ्यावी?

यावेळी विद्यापीठ निर्मित विविध वाणांचे सत्यप्रत बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले होते. यात सोयाबीन एएमएस १००३९ (पीडीकेव्ही आंबा) वाणाचे २९०.३८ क्विंटल, एएमएसएमबी ५-१८ (सुवर्णा सोया) १४७.८८ क्विंटल, एएमएस १००१ (पीडीकेव्ही एलोगोल्ड) ३४.३६ क्विंटल असे ४७२ क्विंटल बियाणे होते. तुरीचे पीकेव्ही तारा वाण ३१.१० क्विंटल या प्रमुख बियाण्यांसह बोरू, धेंचा, धानाचे बियाणेसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले.

आमदार साहेब, ३०० क्विंटल कांदा फेकला हो...!

यावेळी श्रीकृष्ण ठोंबरे या शेतकऱ्याने आमदार सावरकर यांच्याकडे कांदा अनुदान तसेच गेल्या हंगामातील नैसर्गिक आपत्तीच्या भरपाईबाबत शासनाकडून मदतीची मागणी केली. यंदाच्या हंगामात ३०० क्विंटल कांदा फेकून द्यावा लागल्याचे ते म्हणाले. गेल्यावर्षी बार्शीटाकळी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतांत कमरेइतके पाणी वाहले. कुठलीही मदत मिळालेली नसल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com