Bride Groom Entry On Bullock Cart : 'आलीया गावात अजब वरात' ; पुरंदरच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

Bullock Cart In Marriage : कुठे नवरी बुलेटवर बसून लग्नमंडपात येते, तर कुठे नवरीला घेवून जाण्यासाठी नवरदेव चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसून एन्ट्री घेत आहे.
Bride Groom Entry
Bride Groom EntryAgrowon
Published on
Updated on

Pune News : लग्न म्हणजे माणसाच्या आयुष्याला नवं वळण देणारा क्षण. लग्नामध्ये नवरा नवरीची अगदी हौस मौज असते. आपल्या लेकीचं लग्न अगदी थाटामाटात व्हावं, अशी प्रत्येक वधूच्या पित्याची इच्छा असते. त्यामुळे होणाऱ्या जावयाच्या सर्व इच्छा पुरवण्यासाठी नवरीचा बाप तयार असतो.

Bride Groom Entry
Register marriage: खर्चाला फाटा देत त्यांनी केलं रजिस्टर लग्न!

काळ बदलतोय तशा लग्नाच्या पध्दतीही बदलत आहेत. आजकाल शाह पध्दतीने लग्न करण्याची फॅशन आली आहे. कुठे नवरी बुलेटवर बसून लग्नमंडपात येते, तर कुठे नवरीला घेवून जाण्यासाठी नवरदेव चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसून एन्ट्री घेत आहे. मात्र, याला अपवाद ठरलंय ते पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये झालेले लग्न.

Bride Groom Entry
Marriage Season : गावाकडच्या लग्नात डीजे आला कुठून?

पुरंदर तालुक्यातील निळूंज गावात झालेल्या या लग्नाची सर्वत्र एकच चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. आलिशान गाड्यांच्या जमान्यात नवरा नवरी चक्क बैलगाडीतून लग्न मंडपात आल्याने सर्वत्र या लग्नाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.

Bride Groom Entry
Marriage Fraud : लग्न जमवण्याच्या बहाण्याने शेतकरी तरुणांची फसवणूक

लग्न सोहळ्यासाठी रव-वधूची जोडी सजवलेल्या बैलगाडीतून लग्न मंडपात दाखल झाली. आणि लग्नासाठी आलेल्या सर्व पै पाहुण्यांच्या नजरा नवरा नवरीच्या दिशेने वळाल्या. सात ते आठ सजवलेल्या बैलगाड्यांसह नवरा नवरीने लग्न मंडपात दिमाखदार एन्ट्री घेतली. यावेळी अनेकांना हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद करण्याचा मोह आवरला नाही. यापैकीच काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायलर झाले आहे.

आकाश बनकर आणि मेघा चौरे अशी या वधू-वराची नावे असून हे दोघेही शेतकरी कुटुंबातील असल्याने दोघांनीही आपल्या लग्नात आलिशान गाड्यांऐवजी बैलगाडीतून जाण्याचा निर्णय घेतला. सजवलेल्या आलिशान गाडीऐवजी वधू-वराचा जोडा बैलगाडीतून मंडपामध्ये येण्याचा निर्णय उपस्थित सर्वांच्याच पसंतीला उतरला.

बदलत्या काळात जुने रितीरिवाज काळाच्या पडद्या आड होत चालले आहे, अशी चर्चा मंडपात उपस्थित असणाऱ्यांमध्ये सुरू होती. परंतु, या नवदाम्पत्यामुळे जुन्या पंरपरा सुरू राहतील, अशी भावनाही उपस्थितांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com