Gram Panchayat Election : सिंधुदुर्गात भाजपची मुसंडी; १५१ ग्रामपंचायतींवर वर्चस्व

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत २९१ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक १५१ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविले.
BJP
BJPAgrowon
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारत २९१ ग्रामपंचायतींपैकी (Gram Panchayat Election) सर्वाधिक १५१ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ६८ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित करता आली. बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने १२ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून खाते उघडले. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) केवळ दोन तर काँग्रेसला (Congress) जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही.

BJP
Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात भाजप, ‘वंचित’ची बाजी

जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ३४ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली होती. तर ४४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. २९१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान झाले होते. मंगळवार (ता. २०) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळपासूनच कल भाजपच्या बाजूने लागण्यास सुरुवात झाली.

BJP
Gram Panchayat Election : गावगाड्याचा संदेश

अधिकतर कल दुपारपर्यंत हाती आल्यानंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. चुरशीच्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपने विजय संपादन केला. जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ६८ ग्रामपंचायती जिंकता आल्या.

प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला १२ ग्रामपंचायती जिंकता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविता आली. या निवडणुकीत काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. गाव विकास आघाडीने ४३ तर अपक्षांनी चार ग्रामपंचायतींत विजय मिळविला. भाजप आणि शिंदे गटाच्या

युतीने एक ग्रामपंचायती जिंकली.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भाजपचा वरचष्मा राहिला. कणकवली तालुक्यातील ४९ पैकी सर्वाधिक ३२ ग्रामपंचायतींमध्ये भाजपने विजय मिळविला. आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदारसंघातदेखील भाजपने अधिक ४७ ग्रामपंचायती जिंकल्या असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ३० ग्रामपंचायती जिंकल्या.

सावंतवाडीत भाजपच वरचढ

जिल्ह्यात कुडाळ वगळता अन्य तालुक्यांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपच वरचढ ठरला असून या मतदारसंघातील ४६ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या. बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने खाते उघडले असले तरी त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com