Shahu Maharaj Jayanti : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापुरात अभिवादन

Shahu Jayanti 2023 : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. २६) जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आले.
Shahu Jayanti
Shahu JayantiAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. २६) जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आले. शाहूंचे जन्मस्थळ असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेससह त्यांच्या पुतळ्यावर रोषणाई करण्यात आली. वैविध्यपूर्ण उपक्रमांतून रयतेच्या राजाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

Shahu Jayanti
Seed Demand In Kolhapur : कोल्हापुरात बियाण्यांना किरकोळ मागणी

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षि शाहू महाराजांचे जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही राजर्षि शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Shahu Jayanti
kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप; धरणक्षेत्रांत दमदार

या वेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार जयश्री जाधव, आमदार प्रकाश आवाडे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के,

कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी उपस्थित होते. दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी अभिवादन करण्यात आले. यात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, एनसीसी कॅडेटसह राजर्षींच्या चरित्रावर आधारित चित्ररथ, फलक, सजीव देखावे यांचा समावेश होता.

जुना राजवाडा येथे छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महापालिकेतर्फे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात राजर्षि शाहूंच्या जीवनकार्यावर आधारित चित्र-माहिती प्रदर्शन राजर्षि शाहू महाराज जयंती लोकोत्सव समितीतर्फे राजर्षि शाहू खासबाग मैदानात कुस्तीची प्रात्यक्षिके झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com