Bhatghar Dam : भाटघर धरण भरले

Latest Rain Update : भोर तालुक्यातील भाटघर धरण बुधवारी (ता.२०) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास १०० टक्के भरले.
Bhatghar Dam
Bhatghar DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : भोर तालुक्यातील भाटघर धरण बुधवारी (ता.२०) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास १०० टक्के भरले. पाटबंधारे विभागाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजता धरणावरील वीजनिर्मिती केंद्र सुरू करून त्यामधून १ हजार २६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. वीजनिर्मिती केंद्रातून गुरुवारी (ता.२१) सकाळी सहा वाजता सोडण्यात येणाऱ्या पाण्यात ४०० क्युसेकने वाढ करण्यात आली.

धरणाचे स्वयंचलित दरवाजे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता उघडण्यास सुरुवात झाली आणि साडेबारा वाजता धरणाच्या ७ दरवाजांमधून १ हजार ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला.

Bhatghar Dam
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या सरी

त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रातून १ हजार ६१४ क्युसेक आणि स्वयंचलित दरवाजांमधून १ हजार ४०० क्युसेक असे एकूण ३ हजार १४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू झाला. परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे दुपारी दीडच्या सुमारास धरणाचे काही स्वयंचलित दरवाजे बंद झाले.

Bhatghar Dam
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या सरी

गेल्या वर्षी भाटघर धरण १२ ऑगस्टला भरले होते. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरण ३८ दिवस उशिराने २० सप्टेंबरला भरले. वीजनिर्मिती केंद्र सुरु केल्यामुळे धरणाचे ४५ स्वयंचलित दरवाजे उघडले गेले नाहीत.

परंतु पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे गुरुवारी सकाळी सहा वाजता स्वयंचलित दरवाजे उघडले गेले. पावसाच्या कमी-अधिक प्रमाणानुसार धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतील आणि बंद होतील.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे पाटबंधारे विभागाने नीरा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीच्या पात्रात कोणत्याही विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे.

नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलवावे. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com