BRS Rally : भारत राष्ट्र समितीची छत्रपती संभाजीनगरला सभा

तेलंगणातून मराठवाडा मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची आज (ता. २४) छत्रपती संभाजीनगरमधील जबिंदा मैदानावर सभा होत आहे.
K Chandrashekhar Rao
K Chandrashekhar RaoAgrowon

Chhatrapati Sambhaji Nagar तेलंगणातून मराठवाडा मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची आज (ता. २४) छत्रपती संभाजीनगरमधील जबिंदा मैदानावर सभा होत आहे.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील या सभेला ‘बीआरएस’चे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मार्गदर्शन करतील. तेलंगणात ४५० योजना कशाप्रकारे राबविल्या जातात, यावर ते बोलतील.

K Chandrashekhar Rao
BRS Manik Kadam : शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी कंपन्यांचा घशात घालण्याचा सरकारचा डाव: माणिक कदम 

याचवेळी मराठवाड्यातील शेतकरी चळवळीतील तसेच विविध राजकीय पक्षातील आजी-माजी नेते पदाधिकारी मिळून किमान २५० ते ३०० कार्यकर्ते ‘बीआरएस’मध्ये जाहीर प्रवेश करतील, असे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

K Chandrashekhar Rao
BRS Party : ‘बीआरएस’ची छत्रपती संभाजीनगरमध्ये २४ एप्रिलला सभा

शेतकरी आणि गोरगरिबांसाठी तेलंगणामध्ये ज्या कल्याणकारी योजना तेलंगणा सरकार परिणामकारकरीत्या राबविते आहे. त्या योजना महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना राबविणे का शक्य नाही, असा सवाल करीत ‘अबकी बार किसान सरकार' चा नारा ‘बीआरएस’ने दिला आहे.

आज होणाऱ्या सभेसाठी गत आठवडाभरापासून तेलंगणातील प्रमुख नेते छत्रपती संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत. शिवाय मराठवाड्यात जोडल्या गेलेल्या नेत्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपली भूमिका पोचविण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून केला जात आहे, अशी माहिती ‘बीआरएस’चे प्रवेश केलेले शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली. ही सभा अभूतपूर्व होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com