BRS Manik Kadam : शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी कंपन्यांचा घशात घालण्याचा सरकारचा डाव: माणिक कदम 

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana : राज्य सरकारच्या निर्णयाला भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी कडाडून विरोध केला आहे.
BRS Manik Kadam Vs Devendra Fadanavis
BRS Manik Kadam Vs Devendra FadanavisAgrowon

Solar Pump: सौर ऊर्जा पंपासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बुधवारी (ता.१९) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर सौर ऊर्जा पंप बसवण्यासाठी राज्य सरकार ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर वर्षाला एकरी ५० हजार रुपये व हेक्टरी १ लाख २५ देऊन जमीन घेणार आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाला भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी कडाडून विरोध केला आहे.

"शेतकऱ्यांच्या जमिनी सौर ऊर्जेच्या नावाखाली खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे." असा आरोप करत कदम यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

सौर ऊर्जा पंप प्रकल्पामुळे मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांचा दाखल देत कदम यांनी सरकारवर हल्लाबोल केला. कदम पुढे म्हणाले, "आदरणीय धर्मा पाटील यांनी सौर ऊर्जा पंप प्रकल्पामुळे मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्या धर्मा पाटील यांना सरकारने न्याय दिलेला नाही." 

भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मोफत पाणी, २४ तास वीज पुरवठा व १० हजार रुपये मदत अशा आकर्षक घोषणा करत बीआरएसने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.

या सभेचा मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धसका घेतल्याचा दावा कदम यांनी केला आहे.

BRS Manik Kadam Vs Devendra Fadanavis
BRS Party : ‘बीआरएस’ची छत्रपती संभाजीनगरमध्ये २४ एप्रिलला सभा

"शेतकऱ्यांना दिवसभर अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्याचं सरकारला आत्ताच कसं काय सुचलं? सरकारनं बीएसआरच्या संभाजीनगर येथील आयोजित सभेचा धसका घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे." असे कदम म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारच्या निर्णयाचं वर्णन ऐतिहासिक निर्णय असं केलं.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "राज्य सरकारने भाडेतत्त्वावर वर्षाला एकरी ५० हजार रुपये व हेक्टरी १ लाख २५ देऊन देऊन शेतकऱ्यांकडून जमीन घेणार आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे." 

"या योजने अंतर्गत सौर ऊर्जा विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. त्यासाठी वर्षाला एकरी ५० हजार रुपये भाडे देण्यात येईल. आणि त्यामध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ करण्यात येईल," असं उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, शेतकऱ्यांना मोफत पाणी, २४ तास वीज पुरवठा व १० हजार रुपये मदत देण्याचे खुलं आव्हान नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील सभेत बीआरएसचे के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं होतं.

छत्रपती संभाजीनगर येथे २४ एप्रिल रोजी बीआरएसची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com