Mahavitaran : ‘महावितरण’ला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी पुरस्कार

‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्यूसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआय)’ या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार ‘महावितरण’ला मिळाला आहे.
Mahavitaran
MahavitaranAgrowon

Nashik News ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्यूसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआय)’ या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार ‘महावितरण’ला (Mahavitaran) मिळाला आहे. याखेरीज ग्राहक जागृती, माहिती तंत्रज्ञानाचा वापर आणि विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कारही मिळाले आहेत.

‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी बेळगाव येथे समारंभात हे पुरस्कार कंपनीच्या वतीने नुकतेच स्वीकारले. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रमोद देव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. राजा, ‘आयपीपीएआय’चे संचालक हॅरी धौल, हरियाना विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष आर. एन. प्रेशर आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे माजी संचालक चिंतन शाह उपस्थित होते.

Mahavitaran
Electricity Bill Payment : घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढला कल

वीज ग्राहक संख्या, विजेची विक्री, विजेची उत्तम उपलब्धता, बिल वसुलीची कामगिरी, वितरण हानी, अपारंपरिक ऊर्जा वापर आणि स्मार्ट मीटरचा वापर अशा अनेक बाबींचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात आला.

‘महावितरण’ला ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणारी सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणून, तसेच इनोव्हेटिव्ह आयटी ॲप्लिकेशन्स इन पॉवर सेक्टर या गटातही पुरस्कार मिळाला. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com