Police Patil Bharti 2023 : बार्शी, उत्तर सोलापुरातील पोलिस पाटलांची पदे भरणार

Patil Maharashtra Bharti 2023 : सोलापूर उपविभागातील उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यातील जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलिस पाटील पदावर नेमणूक केली जाणार आहे.
Police Patil Bharti
Police Patil BhartiAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर उपविभागातील उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यातील जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलिस पाटील पदावर नेमणूक केली जाणार आहे. या जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलिस पाटील पदाचा जाहीरनामा संबंधित गावच्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा पोलिस पाटील भरती समितीचे अध्यक्ष सदाशिव पडदुणे यांनी दिली.

पोलिस पाटील पदासाठी १८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ (सुट्टीचे दिवस वगळून) संबंधित तहसिल कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जातील. ५ ऑक्टोबर २०२३ ते ९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अर्जाची छाननी होईल. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पात्र अर्जांतून उमेदवारांची यादी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक आणि संबंधित तहसिल कार्यालयांत प्रसिद्ध होईल.

Police Patil Bharti
Police Patil : विक्रगडमध्ये ६० गावांचा ३३ पोलिस पाटलांवर भार

१६ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरला प्रवेश पत्र प्राप्त न झाल्यास २० ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्रमांक एकच्या कार्यालयात ते देण्यात येईल. उपविभागीय अधिकारी कार्यालय क्षेत्रातील सोयीच्या ठिकाणी परीक्षा २२ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत घेण्यात येईल.

Police Patil Bharti
Police Patil Bharti : भोर, वेल्हा तालुक्यांत १३२ पोलिस पाटील पदे भरणार

२५ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. इच्छुक व्यक्तींनी जाहीरनाम्यामधील नमुद पात्रता व अटींचे अधीन राहून अर्ज करावेत, असे आवाहन पडदुणे यांनी केले आहे.

तीन नोव्हेंबरला निवड यादी

उत्तीर्ण उमेदवारांची मूळ कागदपत्रांची छाननी व तोंडी मुलाखत उपविभागीय कार्यालय, उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. एक, सोलापूर या कार्यालयात २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घेण्यात येईल. पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी ३ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com