Lumpy Skin : जनावरे बाजार, चारा वाहतुकीवर बंदी

Livestock Market : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’च्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. जूनपासून आतापर्यंत जवळपास २ हजार जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

Nagar News : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’च्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. जूनपासून आतापर्यंत जवळपास २ हजार जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यास नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारांसह गायवर्गीय जनावरे, चारा वाहतुकीला निर्बंध घातले आहेत.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून जनावरांना ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करत ज्या ठिकाणी प्रादुर्भावग्रस्त जनावरे आढळून आली आहेत, त्या भागापासून २० किलोमीटर अंतरात गायवर्गीय जनावरांचे बाजार, यात्रा, प्रदर्शने, शर्यती, जत्रा, कार्यक्रम आदींवर बंदी घालण्यात आली आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : लम्पी स्कीन आजाराकडे नको दुर्लक्ष

नगर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांत जनावरे नेण्यास व तेथून आणण्यासही बंदी घातली आहे. प्रादुर्भावग्रस्त भागात पशुधनाची ऑनलाइन खरेदी-विक्रीही बंद केली आहे. प्रादुर्भावग्रस्त प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, गवत किंवा अन्य साहित्य नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी बंदी घातली आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin Disease : लम्पीने शेतकरी कोमात, पशुसवंर्धन अधिकारी मात्र जोमात

प्रादुर्भावग्रस्त परिसरात स्वच्छता ठेवून निर्जंतुकीकरण करावे, ‘लम्पी स्कीन’चा विषाणू वीर्यामधूनही बाहेर पडत असल्याने वीर्यमात्रा बनविणाऱ्या संस्थांमार्फत होणारे वीर्य संकलन थांबवावे, सर्व ग्रामपंचायती, नगर पंचायती, नगर परिषदा व महानगरपालिकांमार्फत कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करावे, पशुधनाची काळजी घ्यावी व कीटकनाशक फवारणी मोहीम राबवावी, रोग प्रसारास कारणीभूत डास, माश्या, गोचीड इत्यादींच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोट्यवधींचा फटका बसणार

नगर जिल्ह्यात साधारण १७ ते १८ ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांचे बाजार भरतात. त्यात लोणी (ता. राहाता) काष्टी (ता. श्रीगोंदा), घोडेगाव (ता. नेवासा), वाळकी (ता. नगर) हे बाजार प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षीही लम्पी स्कीनमुळे अनेक महिने बाजार बंद राहिले. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल थांबली होती. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

नगर जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नियंत्रणासाठी बाजार बंद, वाहतुकीला निर्बंध घातल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. संपूर्ण गायवर्गीय जनावरांना लसीकरण केले आहे. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपाययोजना करण्याबाबत जनजागृती करत आहेत.
- डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त, नगर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com