Satara Protest : ‘बळीराजा’ चे साताऱ्यात खर्डा-भाकरी आंदोलन

साखर कारखानदारांच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता.२४) ऐन दिवाळीत तहसील कार्यालयासमोर खर्डा-भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

सातारा : गेल्या तीन वर्षांत साखरेचे दर वाढूनही (Sugar Rate) उसाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांच्या (Sugar Mill) निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे (Baliraja Shetkari Sanghtna) सोमवारी (ता.२४) ऐन दिवाळीत तहसील कार्यालयासमोर Satara Collectors Office) खर्डा-भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले.

‘‘साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर करूनच उसाला तोड घ्यावी आणि ऊसतोड सुरू केल्यास उसाची वाहतूक थांबविण्यात येईल,’’ असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.

येथील तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष विश्‍वास जाधव, उत्तमराव खबाले, पोपट जाधव, सचिन पाटील, दीपक पाटील, शंभूराज पाटील, गणेश शेवाळे, युवा अध्यक्ष बाबा मोहिते, सागर कांबळे व शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com