Chana Cultivation
Chana CultivationAgrowon

Chana Cultivation : हरभरा पिकाला अतिरिक्त ओलीत टाळा

चालू वर्षात चांगला पाऊस झाल्‍यामुळे मुबलक प्रमाणात जलसाठा निर्माण झाला. तसेच जमिनीत ओलावा असल्‍यामुळे रब्‍बी हंगामात हरभऱ्याची अधिक क्षेत्रावर पेरणी झाली.
Published on

वाशीम : जिल्ह्यात चालू वर्षात चांगला पाऊस झाल्‍यामुळे मुबलक प्रमाणात जलसाठा (Water Storage) निर्माण झाला. तसेच जमिनीत ओलावा (Soil Moisture) असल्‍यामुळे रब्‍बी हंगामात हरभऱ्याची अधिक क्षेत्रावर पेरणी (Chana Sowing) झाली. या पिकाला अतिरिक्त ओलीत टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

Chana Cultivation
Chana Rate : हरभऱ्याला यंदा चांगला भाव मिळण्याचा अंदाज

चांगली परिस्थिती असल्याने जिल्ह्यात हरभऱ्याची सुमारे ८० हजार हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली आहे. सरासरी क्षेत्राच्‍या १३ टक्के अधिक पेरणी झाली आहे. ऑक्‍टोबरमध्‍ये पेरणी केलेले पीक परिपक्‍व होण्‍याच्या अवस्‍थेत आहे. उशिरा पेरणी केलेले पीक काही ठिकाणी वाढीच्‍या, तर कुठे फुलोरावस्‍थेत आहे

Chana Cultivation
Chana Market: हरभरा भाव यंदा कसे राहतील?

हरभरा पिकास साधारणतः २५ सेंटीमीटर पाण्‍याची आवश्‍यकता असते. हरभरा पिकास जास्त पाणी दिल्‍यामुळे मूळ सडून पीक उत्‍पादनात घट येण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे हरभरा पिकास पाणी देताना जमिनीचा मगदूर पाहून पाण्‍याचे नियोजन करावे.

हरभरा हे मुख्‍यत्‍वे कोरडवाहू पिकामध्‍ये मोडते. थंडीचा कालावधी या पिकास अतिशय पोषक असतो. अशावेळी पिकांच्‍या अवस्‍थेनुसार हरभरा पिकास जास्‍तीत जास्‍त तीनच पाण्‍याच्‍या पाळ्या द्याव्‍यात.

पिकास तुषार संचाद्वारे पाणी देत असताना पिकामध्‍ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्‍यावी.

जमिनीत नेहमी वापसा परिस्थिती राहिल्‍यास पिकाची वाढ चांगली होते. फुलांवर येण्‍यापूर्वी, फुलावर आल्‍यानंतर व घाट्यामध्‍ये दाणे भरण्‍याचे अवस्‍थेत पाणी द्यावे.

जास्‍तीचे पाणी या पिकास दिल्‍यास फायदा होण्‍याऐवजी नुकसान होण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे शक्‍यतोवर हरभरा पिकास अतिरिक्‍त पाणी देऊ नये, असेही श्री. तोटावार यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com