सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील वातावरणात बदल (Change Weather) झाला असून मंगळवारी (ता. २४) सायकांळी काही भागात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) निर्माण झाले.
पुढील दोन दिवसांत जिल्ह्याच्या काही भागांत अवकाळी पावसाचा (Avkali Pauas) अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सायकांळपासून वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. सायकांळी उशिरा ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर रात्री हवेत प्रचंड गारवादेखील निर्माण झाला होता.
बुधवारी (ता. २५) पहाटेपासूनदेखील ढगाळ वातावरण निर्माण झाले. दरम्यान जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी (ता. २६) हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
या अंदाजामुळे आंबा, काजू बागायतदाराच्या तोंडचे पाणी पळाले आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर सावरलेल्या बागायतदारांनी प्रचंड मेहनतीने आंबा, काजू बागांचे व्यवस्थापन केल्यामुळे सध्या अनेक ठिकाणी आंब्याला फळधारणा झाली आहे.
तर काही ठिकाणी मोहर स्थितीतदेखील आहे. काजूलादेखील चांगला मोहर आणि फळधारणा झाली आहे. त्यामुळे अशा स्थितीत अवकाळी पाऊस झाला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या विवंचनेने बागायतदार धास्तावले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.