Weather Forecast : अचुक हवामान अंदाजावर संशोधनासाठी सामंजस्य करार

बदलत्‍या हवामानाचा कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे तालुकानिहाय अचुक हवामान अंदाज व त्‍याआधारे ठोस कृषी सल्‍ला शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्‍याची आवश्‍यकता आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

परभणी ः मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांना अचुक हवामान अंदाज (Weather Forecast) आणि कृषी सल्‍ला (Crop Advisory) याअनुषंगाने संशोधन करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (Indian Space Research Organization) (इस्त्रो) अहमदाबाद येथील अंतराळ उपयोग केंद्र आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात मंगळवारी (ता. १७) अहमदाबाद येथे सामंजस्य करार करण्यात आला.

Weather Update
Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार

कुलगुरु डॉ. इंद्र मणी आणि अंतराळ उपयोग केंद्राचे संचालक डॉ. नीलेश देसाई यांनी करारावर स्‍वाक्षरी केली.

या वेळी ‘बीपीएसजी’चे समूह संचालक डॉ. बिमल कुमार भट्टाचार्य, कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे, ‘बीपीएसजी’चे डॉ. राहुल निगम, अँटेना विभागाचे ग्रुप डायरेक्टर डॉ. मिलिंद महाजन, ग्रुप डायरेक्टर डॉ. रश्मी शर्मा, डॉ. गायत्री, डॉ. डी. आर रजक, डॉ. मेहुल पंड्या, विवेक पांडे, अमित जैन आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. इंद्र मणी म्‍हणाले, की बदलत्‍या हवामानाचा कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे तालुकानिहाय अचुक हवामान अंदाज व त्‍याआधारे ठोस कृषी सल्‍ला शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्‍याची आवश्‍यकता आहे.

भविष्‍यात कृषी क्षेत्रात अंतराळ विज्ञानाचा मोठा वापर होणार आहे. अहमदाबाद अंतराळ उपयोग केंद्राच्‍या माध्‍यमातून परभणी कृषी विद्यापीठात संशोधन केंद्र स्‍थापन होणे गरजेचे आहे.

डॉ. देसाई म्‍हणाले, की या सामजंस्‍य करारामुळे संयुक्‍त संशोधन कार्यास चालना मिळणार आहे. विद्यार्थी, संशोधक आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. अचुक हवामान अंदाजाकरिता इस्रोकडे उपग्रहांकडून प्राप्‍त आकडेवारी अत्‍यंत उपयुक्‍त ठरेल.

Weather Update
Weather Effect On Crop : वाल पिकावर हवामानाचा परिणाम

डॉ. भट्टाचार्य म्हणाले, शेतीच्या वास्तविक समस्या ओळखण्यासाठी अॅग्रोमेट युनिटसोबत ड्रोन आधारित तंत्रज्ञान आणि उपग्रह आधारित प्राप्‍त होणारी आकडेवारीचा शेती क्षेत्रात वापराबाबत विद्यापीठासोबत काम करण्याची इच्छा आहे.

डॉ. डाखोरे म्हणाले, भविष्‍यात इस्रोकडून उपग्रहाच्‍या माध्‍यमातून येणाऱ्या विविध आकडेवारीचा अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अचुकपणे ओळखणे शक्‍य होईल.

सामजंस्य कराराचे महत्त्व...

या सामंजस्य करारामुळे मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांना अचुक, काटेकोरपणे कृषी हवामान अंदाज व त्‍यावर आधारित कृषी सल्‍ला सेवा तत्‍परतेने व प्रभावीपणे देणे शक्‍य होईल.

परभणी कृषी विद्यापीठास विभागवार, जिल्हानिहाय कृषी हवामान सल्ला तयार करण्यासाठी उपग्रहांकडून प्राप्‍त विविध स्‍वरुपाची आकडेवारीचा लाभ होईल. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनासही याचा लाभ होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com