
खडकवासला, जि. पुणे ः खडकवासला धरण साखळीतील (Khadkwasala Dam Chain) चारही धरणांत मिळून शुक्रवारी (ता. २२) २० टीएमसी म्हणजे ६९ टक्के पाणीसाठा जमा (Water Stock In Dam) झाला आहे. शहर जिल्ह्याला पिण्यासाठी व शेतीसाठी (Water For Agriculture) आवश्यक असलेला किमान ३०- ३८ टीएमसी पाण्याची गरज असते. तेवढा पाणीसाठा धरणात अद्याप जमा झालेला नाही. पाटबंधारे विभागाला (Irrigation Department) धरण साखळीत आणखी किमान १० टीएमसीची आवश्यकता आहे.
पाटबंधारे विभाग दर वर्षी पुणे शहराला पिण्यासाठी सुमारे सुमारे १८ टीएमसी पाणी देते. त्याचबरोबर रब्बी आणि उन्हाळ्यासाठी सुमारे किमान १५ टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. ते पाणी कालव्यातून सोडले जाते. त्याव्यतिरिक्त खरीप हंगामात म्हणजे सध्या पावसाळ्यात खडकवासला धरणाच्या कालव्यातून सरासरी पाच ते दहा टीएमसी पाणी सोडले जाते. हे पाणी पावसाळ्यातील उपलब्धतेनुसार त्याचे नियोजन असते. अशा प्रकारे पाटबंधारे विभागाला दरवर्षी किमान ३०- ३८ टीएमसीची आवश्यकता असते.
चारही धरणांची क्षमता मात्र २९.१५ टीएमसी आहे. मग जादा पाणी कसे दिले जाते. पाऊस पडताना कालव्यातून जुलै ते ऑक्टोबर अखेर खरिपात सरासरी पाच ते दहा टीएमसी पाणी दिले जाते. हे पाणी उपलब्धतेनुसार म्हणजे खडकवासला धरण भरल्यानंतर धरणाची पातळी कायम ठेवण्यासाठी पाणी नदीत सोडण्याएवजी कालव्यातून सोडले जाते. पुणे शहराला २० दिवसाला एक टीएमसीची गरज असते. या चार महिन्यात (१२० दिवसांत) शहराला पिण्यासाठी किमान सहा टीएमसी पाणी वापरले जाते. दर वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी धरण साखळीतील पाण्याचे नियोजन केले जाते.
धरणांतील शनिवार (ता.२३) सकाळी सहा वाजेपर्यंची स्थिती
धरणाचे नाव / एकूण क्षमता(टीएमसी)/ उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) / टक्केवारी / मागील २४ तासांतील पाऊस (मिलिमीटर मध्ये)
खडकवासला- १.९७/१.९१/९६.८७/०
पानशेत- १०.६५/७.६६/७१.९९/३
वरसगाव- १२.८२/८.५०/६६.३३/३
टेमघर- ३.७१/२.०९/५६.२८/१७
जिल्ह्यातील धरणांविषयी...
चार धरणांतील एकूण क्षमता २९.१५ टीएमसी
आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २०.१७ टीएमसी / ६९.१९ टक्के
खडकवासला कालव्यातून १००५ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.