Ashadhi Ekadashi 2023 : कधी आहे आषाढी एकादशी?, जाणून घ्या मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व...

Ashadhi Wari Palkhi Sohala : आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. याच एकादशीनिमित्त राज्यात विविध संतांच्या पालखी सोहळ्यांना सुरवात झाली असून, राज्यभरातून लाखों वारकरी पायी पंढरपूरला निघाले आहेत. जाणून घेऊया आषाढी एकादशी कधी आहे?
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023Agrowon
Published on
Updated on

Ashadhi Palkhi Sohala : प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी म्हणतात. या आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले झाले आहे. यंदा आषाढी एकादशीला गुरुवार दि. २९ जून रोजी पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी प्रारंभ होणार असून ते शुक्रवार दि. ३० जून रोजी पहाटे २ वाजून ४२ रोजी समाप्त होणार आहे.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023 : ‘हरित वारी, स्वच्छ वारी’ संकल्पनेवर आषाढी वारीचे नियोजन

महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक पायी वारी करीत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात. विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून संतांच्या दिंड्या विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येत आहेत. एकादशीच्या दिवशी पंढरपूरात वैश्वांचा मेळा भरतो.

आषाढी एकादशीला पंढरपूरात आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये मोठ्या संख्येने वारकऱ्यांची गर्दी होते. आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येथे येते.

एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी वारकरी एकभुक्त राहतात. रात्रीभर हरिभजन करत जागरण करतात. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विठ्ठलाची पूजा करतात. त्यानंतर संपूर्ण दिवस उपवास करत असतात. तसेच दिवसभर विठ्ठल नामाचा जयघोष करत देवाच्या नामस्मरणात घालवता. ज्या लोकांना पंढरपूरचा जाणे शक्य नसते. असे लोक उपवास करून जवळच्या मंदिरात जाऊन विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com