Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

Irrigation Department : शेतकरी अक्रमक; कार्यकारी अभियंत्यांकडून आदेश मागे

Latest Agriculture News : पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी, शेतकऱ्यांनी पाटपाणी भरल्यानंतर सात-बारा उताऱ्यावर जेवढे क्षेत्र आहे, त्या संपूर्ण क्षेत्रावर पाणीपट्टी आकारणी करावी, असा कार्यकारी अभियंत्यांनी आदेश काढला.
Published on

Nagar News : पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी, शेतकऱ्यांनी पाटपाणी भरल्यानंतर सात-बारा उताऱ्यावर जेवढे क्षेत्र आहे, त्या संपूर्ण क्षेत्रावर पाणीपट्टी आकारणी करावी, असा कार्यकारी अभियंत्यांनी आदेश काढला.

या आदेशाच्या विरोधात श्रीरामपुरला शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी अक्रमक झाल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी नमते घेत हा आदेश मागे घेतला आहे. मात्र ‘हा आदेश काढलाच कसा, हे नेमके कोणी षडयंत्र रचले याचा खुलासा झाला पाहिजे’, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश ताके यांनी केली.

भंडारदरा लाभक्षेत्रातील पाणी लाभार्थी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी पाटपाणी अर्ज भरल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या नावे सात-बारावर जेवढे क्षेत्र आहे. त्या सर्व क्षेत्राला पाणीपट्टी आकारावी, असा आदेश जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी चार दिवसांपूर्वी काढला होता. मुळात इतर भागाच्या तुलनेत या ठिकाणी पाणी महाग आहे.

Agriculture Irrigation
Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’मुळे ओढे-नाले तुडुंब

त्यातच असा आदेश अन्यायकारक असून हे शेतकऱ्यांविरुद्ध षड्यंत्र रचले जात असल्याचे सांगत श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अक्रमक झाले व श्रीरामपूर येथील जलसंधारण विभागाच्या कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. ११) सुरेश ताके, जितेंद्र भोसले, भरत आसने, दत्तात्रय लिप्टे, किशोर पाटील, रवी वाबळे, रामचंद्र पटारे, राजेंद्र भांड, संदीप गवारे, जगन्नाथ भोसले, ईश्वर दरंदले, विजय बडाख, नामदेव येवले, जालू लवांडे, बाबासाहेब बडाख, बाळासाहेब बडाख यांच्यासह शेतकऱ्यांनी अंदोलन करत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी, शेतकऱ्यांनी पाटपाणी भरल्यानंतर सात-बारा उताऱ्यावर जेवढे क्षेत्र आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : सिमेंट बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार शाश्‍वत पाण्याचे माध्यम

त्या संपूर्ण क्षेत्रावर पाणीपट्टी आकारणी करावी व आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करत भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीने आदेशाची होळी केली. असा आदेश काढून भंडारदरा धरणाचे लाभक्षेत्र कमी करून भंडारदरा धरणाचे पाणी जायकवाडीच्या वॉटर ग्रीडसाठी किंवा निळवंडे लाभक्षेत्राला देण्याचा डाव उधळून लावू. त्यासाठी हिंसक आंदोलन करू, असा इशारा दिला.

शेतकरी अक्रमक झाल्याचे दिसताच कार्यकारी अभियंत्यांनी हा आदेश शुक्रवारी उशिरा मागे घेऊन सुधारित आदेश काढला आहे. मात्र ‘हा आदेश काढलाच कसा, हे नेमके कोणी षड्यंत्र रचले याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी शेतकरी नेते सुरेश ताके यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com