पुणे ः देशपातळीवर दुग्ध व्यवसायाच्या (Dairy Business) प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या ‘इंडियन डेअरी असोसिएशन’च्या (Indian Dairy Association) उपाध्यक्षपदी अरुण पाटील (Arun Patil) यांची नुकतीच निवड झाली. गेली १५ वर्ष अरुण पाटील हे ‘इंडियन डेअरी असोसिएशन’च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष होते.
पाटील यांनी आयआयटी, खरगपूर येथून एम. टेक (डेअरी आणि फूड इंजिनिअरिंग) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अकरा वर्षे ते राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डात कार्यरत होते. देश पातळीवर दुग्ध व्यावसायिकांसाठी वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्रे तसेच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात पाटील यांचा मोठा वाटा आहे.
१९४८ मध्ये स्थापन झालेली ‘इंडियन डेअरी असोसिएशन’ ही देशातील डेअरी उद्योगातील सर्वोच्च संघटना आहे. विविध राज्यांतील दूध उत्पादक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ, अध्यापक आणि विविध संस्था या संघटनेशी जोडलेल्या आहेत. देशामध्ये संघटनेची चार विभागीय कार्यालये आहेत. या संघटनेची निवडणूक नुकतीच झाली.
यामध्ये ‘अमूल’चे डॉ. आर. एस. सोढी यांची अध्यक्षपदी आणि अरुण पाटील, अजय खोसला यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सार्वजनिक गटातून राजेश लेले आणि दूध उत्पादक गटातून चेतन अरुण नरके हे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.