Solapur Tur : सोलापूरच्या बाजारात कर्नाटकच्या तुरीची आवक

यावर्षी अतिवृष्टीने तुरीचे पीक नुकसानीत सापडले असताना, कर्नाटकात मात्र तुरीचे बंपर पीक आले आहे. त्यामुळे येथील मार्केट यार्डात तुरीच्या बाजारात कर्नाटकच्या तुरीचा बोलबाला आहे.
Solapur Tur Market News
Solapur Tur Market Newsagrowon

सकाळ वृत्तसेवा
Solapur News : यावर्षी अतिवृष्टीने तुरीचे पीक (Tur Crop) नुकसानीत सापडले असताना, कर्नाटकात मात्र तुरीचे बंपर पीक आले आहे.

त्यामुळे येथील मार्केट यार्डात तुरीच्या बाजारात कर्नाटकच्या तुरीचा बोलबाला आहे.

Solapur Tur Market News
Solapur : सोलापूरच्या विमानसेवेसाठी संयुक्त बैठक बोलवावी

तुरीचा हंगाम सुरू झाला आहे. दरवर्षी तुरीच्या हंगामात दोन टप्पे असतात. सुरवातीला कर्नाटकची तूर येते व नंतर स्थानिक व मराठवाड्यातील तुरीची आवक सुरू होते.

यावर्षी मात्र महाराष्ट्रातील तुरीच्या पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे तुरीची आवक महाराष्ट्रातून कमी झाली. दुसरीकडे, कर्नाटकात मात्र तुरीच्या पिकाची स्थिती मात्र चांगली आहे.

Solapur Tur Market News
Tur Market : नव्या तुरीची आवक वाढली का?

सीमेवरील चडचण, इंडी, विजयपूर, आलमेल भागात अतिवृष्टी झाली नसल्याने तुरीचे बंपर पीक आले आहे. योग्य वेळी तुरीचे पीक उत्तम आले,

पण त्यासोबत त्याची गुणवत्ता देखील चांगली आहे. मागील दोन वर्षात सर्वांत चांगले पीक सीमावर्ती भागात हाती आले आहे.

यार्डात तुरीची आवक जोरात सुरू झाली आहे. हमीभावाच्या तुलनेत तुरीचे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.

राज्यात तुरीचे पीक कमीच हाती आले तर सध्याचे तुरीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुगाचे भाव आधीच वाढले आहेत. त्यासोबत तुरीची भाववाढ होण्याची शक्यता
आहे.

यावर्षी तुरीची आवक कर्नाटकातून वाढली आहे. पण मराठवाड्यातून पीक हाती आले नसल्याने अडचणी आहेत. दररोज यार्डात ३० ते ४० गाड्यांची आवक सुरू आहे.
- महादेव मठपती, आडत व्यापारी, मार्केट यार्ड, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com