Bhendi, Chilli New Variety : अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या मिरची, भेंडी वाणास मान्यता

पायाभूत बियाणे मिळण्याचा मार्ग मोकळा
Bhendi, Chilli New Variety
Bhendi, Chilli New VarietyAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV, Akola) निर्मित मिरची (Chilli) आणि भेंडीचे (Bhendi) वाण केंद्रीय समितीद्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राव्दारे भेंडी पिकाचे ‘पीडीकेव्ही प्रगती‘ (PDKV Pragati) आणि मिरचीचा ‘पीडीकेव्ही ‘हिरकणी’ (PDKV Hirkani) असे वाण व्यावसायिक बीजोत्पादनानसाठी भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत. या दोन्ही वाणांची शिफारस ही खरीप हंगामासाठी केली आहे.

Bhendi, Chilli New Variety
कोणत्या जमिनीत घ्यावं भेंडी पीक 

पीडीकेव्ही प्रगती’ या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यम आकार, आकर्षक हिरव्या रंगाची भेंडी ही विषाणुजन्य केवडा रोगास मध्यमदृष्ट्या प्रतिकारक्षम असून त्याची उत्पादन क्षमता हेक्टरी १५० क्विंटलपर्यंत आहे. मिरचीचा पीडीकेव्ही हिरकणी हा वाण अपरिपक्व अवस्थेत असताना गर्द हिरवा रंग आणि परिपक्व अवस्थेत गर्द लाल रंगाचा असतो. कीड व रोगास मध्यम प्रतिकारक आहे. हिरव्या मिरचीची उत्पादनक्षमता प्रतिहेक्टरी २५० ते ३०० क्विंटल आणि लाल मिरचीची उत्पादन क्षमता २५ ते ३० क्विंटल आहे. रोग आणि किडीस मध्यम प्रतिकारक असून मध्यम तिखटपणा आणि उत्तम लाल रंगाची पावडर मिळते.

Bhendi, Chilli New Variety
Vegetable : मिरची, वांगी उत्पादनातून मिळाला उन्नतीचा मार्ग

मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एस. एम. घावडे, सहायक प्रा. पी. पी. गावंडे, सहयोगी प्रा. डॉ. डी. टी. देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाण निर्मितीसाठी प्रयत्न केले. राष्ट्रीय स्तरावरील वाण निवड समितीला उद्यानविद्या विषयक वाणांची निवड करण्याचे अधिकार दिलेले आहेत. या समितीचे अध्यक्ष भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या) डॉ. ए. के. सिंग होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या वाणांचे सादरीकरण करण्यात आले.

Bhendi, Chilli New Variety
भेंडी पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

२०१८ मध्ये झालेल्या राज्यातील कृषी विद्यापीठांच्या ज्वाइंट ॲग्रेस्कोमध्ये या वाणांची शिफारस झाली होती. त्याचवर्षी राज्य वाण निवड समितीने राज्यासाठी हे वाण प्रसारित केले होते. त्यानंतर आवश्‍यक कार्यवाहीनंतर हे वाण देशपातळीसाठी प्रसारित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. नुकतेच भारत सरकारच्या राजपत्रात या वाणांना प्रसिद्धी देण्यात आली. यामुळे पायाभूत बियाणे शेतकरी, बीजोत्पादक, कंपन्यांना विक्री करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com