Agril Exhibition : शेतकऱ्यांकडून नवीन संकल्पनांना दाद

कृषी प्रदर्शनात प्रात्यक्षिकांची माहिती घेत असल्याने शेतकरी-विद्यापीठ संवाद वाढला
agri exhibition
agri exhibition Agrowon

अकोला ः कोरोनामुळे (Corona) गेले दोन वर्षे न झालेले कृषी प्रदर्शन यंदा भरविण्यात आले. या कृषी प्रदर्शनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. शेतकरी अधिक सक्रियपणे येथे दाखल होत असून प्रदर्शनात मांडलेल्या नवनवीन संकल्पनांना दाद देत आहे. गेल्या तीन दिवसांत सुमारे पाच लाखांवर शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिल्याचा दावा विद्यापीठ नोंदीच्या आधारे केल्या जात आहे.

agri exhibition
Kisaan Agril. Exhibition : किसान कृषी प्रदर्शनास मोशी येथे सुरूवात

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या पाच दिवसांच्या कृषी प्रदर्शनात दररोज गर्दी वाढत आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांच्या दालनांना भेटी देऊन खासगी उद्योग समूहांच्या दालनात गर्दीचा ओघ कायम आहे.

agri exhibition
Krushik Exhibition : कृषिक प्रदर्शनचा १९ पासून बारामतीत प्रारंभ

ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सूक्ष्म तुषार सिंचन, खत संयंत्र इत्यादी बद्दल माहिती घेत आहेत. सूक्ष्म सिंचनाद्वारे फर्टिगेशन, ठिबक व तुषार सिंचनाचे फायदे, ड्रीप फर्टिगेशन, व्हेंच्युरी खत संयंत्र, रेनगन, उत्सर्ग झडप, पाइप सिंचनाच्या वस्तूंची मांडणी केली आहे. अपारंपरिक ऊर्जा तंत्रज्ञान विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या दालनात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर आधारित घरगुती वापराची उपकरणे सोलार ट्री, सोलार कुकर, सुधारित धूर विरहित चुली व शेती कामात उपयोगी पडणारे सौरऊर्जा चलित कीटकसापळा, सौर वाळवण यंत्र, सोलर टनेल ड्रायर, सौरचलित धान, गहू कापणी यंत्र, सौरचलित डवरणी यंत्र, सोलार कॅबिनेट ठेवण्यात आलेले आहे.

कृषी शक्ती व अवजारे विभागांतर्गत लावलेल्या दालनात रुंद वरंबा सरकी टोकण व आंतरमशागत यंत्र, ट्रॅक्टरचलित लसूण टोकण यंत्र, ट्रॅक्टरचलित हळद कापणी यंत्र, ठिबक नळी गुंडाळण्याचे यंत्र, ट्रॅक्टरचलित पीक अवशेष जमा करण्याचे यंत्र, सायकलचलित डवरा, छोटा ट्रॅक्टर चलित डवरणी यंत्र, ऊस बेणे व कडबा कुट्टी यंत्र, ट्रॅक्टरचलित रोटरी विडर इत्यादी उपकरणांचे मॉडेल प्रात्यक्षिकांसह दर्शविण्यात येत होती.

पीकेव्ही हाय-२ या बीटी संकरित वाणासोबतच एकेएच-०८१ व रजत या विद्यापीठाद्वारे निर्मित बीटी वाणांविषयी शेतकऱ्यांमध्ये  उत्सुकता दिसून येत आहे. शेतीमाल साठवणुकीच्या दृष्टीने ‘कांदा चाळ’ व ‘बांधावरील शीतकीय साठवण गृहा’चे आकर्षण आहे. तेलबिया संशोधन केंद्राच्या दालनात तेलबिया पिकांच्या विविध वाणांचे नमुने त्यांच्या माहिती फलकांसह प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.

भारत गणेशपुरे यांनी जिंकली मने
दुपारी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेत, तसेच शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजी-माजी विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रम झाला. यामध्ये सिने अभिनेता भारत गणेशपुरे यांनी आपल्या जीवनाचे अनुभव मांडले. आंतरिक इच्छाशक्ती हे यशामागील सर्वांत मोठे भांडवल असल्याचे सांगितले. कृषी पदविधरांसमोरील संधी व आव्हाने या विषयावर डॉ. एन. डी. पाटील पिलीवकर यांनी मनोगत मांडले. औषधी सुगंधी वनस्पती उत्पादन व निर्यात विषयावर विजयकुमार लाडोळे, जैविक कीड नियंत्रण विषयावर संगीता सव्वालाखे (यवतमाळ), उद्योजकता विकास विषयावर विवेक तोंडरे (चंद्रपूर), तर अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योगाच्या संधी या विषयावर गणेश देशमुख, सुजित गुप्ता यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव कथन केले. हळद उत्पादक मनोज गायधने यांनीही मार्गदर्शन केले.

कोरोनाच्या दोन वर्षांतील निर्बंधानंतर या वर्षी भरलेल्या या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान न्याहाळत आहेत. मी नुकतेच पुण्यातील एक प्रदर्शन केले. पण त्याहीपेक्षा मला येथील प्रतिसाद अधिक मिळतो आहे. तीन दिवसांत सुमारे ३५ पेक्षा अधिक ऑर्डर माझ्याकडे नोंद झाल्या. आणखी त्यात वाढच होत आहे.
- निखील जळमकर, कृषियंत्र निर्माता, मूर्तिजापूर, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com