Kisaan Agril. Exhibition : किसान कृषी प्रदर्शनास मोशी येथे सुरूवात

भारतातील सर्वात मोठे असलेल्या किसान कृषी प्रदर्शनास बुधवार (ता.१४) पासून भोसरीजवळील मोशी येथे सुरूवात झाली. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता.१८) सुरू राहील.
agri exhibition
agri exhibition Agrowon
Published on
Updated on


पुणे : भारतातील सर्वात मोठे असलेल्या किसान कृषी प्रदर्शनास (Kisan Krishi Exhibition begins at Moshi) बुधवार (ता.१४) पासून भोसरीजवळील मोशी (Moshi) येथे सुरूवात झाली. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता.१८) सुरू राहील. प्रदर्शनाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना येथे शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान पाहता येईल. कोरोनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.

agri exhibition
Akola Agril Department : अकोला कृषी विभागाच्या अडचणी सुटता सुटेनात

पंधरा एकर परिसरात असलेल्या या कृषी प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे सादरीकरण केले आहे. देशभरातील दीड लाखाहून अधिक शेतकरी प्रदर्शनास भेट देतील, असा अंदाज आहे. यंदा कृषी प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, पशुधन जैव, ऊर्जा, रोपवाटिका आणि शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल आहेत.

agri exhibition
Monsoon Update: मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली | ॲग्रोवन

पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या ६० हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद आणि त्यांच्या संशोधन संस्थांचाही कृषी प्रदर्शनात सहभाग आहे. बाजारभाव, जलव्यवस्थापन, शेतीमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना यामध्ये आहेत. कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधी यावरही माहिती मिळेल.
-------------
चौकट ः
...अशी करा नोंदणी :
प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांचा वेळ वाचावा, यासाठी मोबाईल अॅपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सुविधा आहे. प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क १५० रुपये आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा किसान मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com