Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंकडे आता पशुसंवर्धन आणि दुग्ध विभाग, राज्यात तब्बल ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Officer Maharashtra : सर्वात चर्चेत असलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Tukaram Mundhe
Tukaram Mundheagrowon
Published on
Updated on

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारने मागच्या दीड वर्षात पहिल्यांदाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान सर्वात चर्चेत असलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांची कृषी मंत्री पदी निवड झाली तर काल (ता.२१) तुकाराम मुंढे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याने दोन मुंडे मिळून कृषी कारभार चालवणार हा चर्चेचा विषय बनला आहे.

तुकाराम मुंढे यांना मागच्या महिन्यात मराठी भाषा विभागात सचिवपदी नियुक्ती करण्यात आले होते. परंतु त्यांनी पदभार स्विकारला नसल्याने जोरदार चर्चा झाली. दरम्यान तुकाराम मुंढे यांची गेल्या १६ वर्षांत तब्बल २० वेळा बदली झाली आहे.

राज्य सरकारने ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी काल (ता.२२) संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारीही मिळाले आहेत.

Tukaram Mundhe
State Government : वैधानिक विकास महामंडळांचे पुनर्गठन; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यातील ४१ अधिकाऱ्यांच्या अशा झाल्या बदल्या

राजेंद्र शंकर क्षीरसागर (मुंबई शहर जिल्हाधिकारी), वर्षा ठाकूर-घुगे (लातूर जिल्हाधिकारी), आयुष प्रसाद (जळगाव जिल्हाधिकारी), बुवनेश्वरी एस (वाशीम जिल्हाधिकारी), अजित कुंभार (अकोला जिल्हाधिकारी), डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ (जालना जिल्हाधिकारी), डॉ. पंकज आशिया (यवतमाळ जिल्हाधिकारी ).

कुमार आशीर्वाद (सोलापूर जिल्हाधिकारी), सौरभ कटियार (अमरावती जिल्हाधिकारी), तृप्ती धोडमिसे (सांगली झेडपी सीईओ), अंकित (जळगाव झेडपी सीईओ), शुभम गुप्ता (धुळे झेडपी सीईओ), मीनल करनवाल (नांदेड झेडपी सीईओ), पवनीत कौर (संचालक जी एस डी ए), गंगाथरण डी (बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त).

Tukaram Mundhe
Maharashtra Monsoon Session 2023 : ‘रिलायन्स’मुळे नांदेड, लातूर विमानतळे बंद

शनमुगराजन एस (अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई, विजय राठोड (सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी मुंबई), निमा अरोरा ( संचालक, माहिती तंत्रज्ञान मुंबई), संजय खंदारे यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय), आर. एस. चव्हाण मुख्य कार्यकारी कार्यालय, रुचेश जयवंशी यांची एनआरएलएम मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई.

पृथ्वीराज बी. पी. (लातूर जिल्हाधिकारी ) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर, मलिंद शंभरकर (सोलापूर जिल्हाधिकारी) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई तर मकरंद देशमुख - उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com