POCRA : ‘पोकरा’तील गावांना करता येणार ‘महाडीबीटी’वर अर्ज

MahaDBT : ‘अॅग्रोवनने हा मुद्दा समोर आणल्यानंतर ही सुधारणा करण्याचे आदेश कृषी, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन विभागाचे अवर सचिव महेंद्र घाटगे यांनी बुधवारी (ता.३०) यांनी दिले आहेत.
POCRA
POCRAAgrowon
Published on
Updated on

Akola News : राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) गावांमधील शेतकऱ्यांना आता कृषी विभागाच्या महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची मुभा मिळाली आहे.

‘अॅग्रोवनने हा मुद्दा समोर आणल्यानंतर ही सुधारणा करण्याचे आदेश कृषी, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन विभागाचे अवर सचिव महेंद्र घाटगे यांनी बुधवारी (ता.३०) यांनी दिले आहेत.

‘पोकरा’ची अंमलबजावणी होत असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी निर्बंध होते. परंतु आता या गावातील शेतकऱ्यांनाही महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची सुविधा देण्याचा निर्णय शासनस्तरावरून झाला आहे.

POCRA
POCRA Project : ‘पोकरा’ला पोखरतेय कोण?

मध्यंतरी अनेक महिने पोकरा प्रकल्पाच्या गावांतील शेतकऱ्यांना ही सुविधा मिळत नव्हती. संबंधित गावातील सर्व शेतकऱ्यांचीच निवड होऊ शकत नव्हती. शिवाय निवडीची प्रक्रियासुद्धा अनेक गावात रेंगाळली होती. अशा स्थितीत इतर शेतकऱ्यांनाही ‘पोकरा’शिवाय महाडीबीटी प्रणालीचा फायदा घेता येत नव्हता.

POCRA
POCRA Scheme : पोकराच्या अवजारे ‘गायब’प्रकरणात नोटीस प्रक्रिया सुरु

‘पोकरा’चा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतरही ‘महाडीबीटी’ प्रणालीची सुविधा या गावातील शेतकऱ्यांना मिळत नव्हती. अखेरीस आता ‘पोकरा’च्या गावांतील शेतकऱ्यांनाही महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कृषी आयुक्तांना सूचना करण्यात आली आहे.

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील ४६८२ गावे, जळगाव जिल्ह्यातील ४६० गावे, तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे. महाडीबीटीवर अर्जाची सुविधा देण्यासंबंधी तातडीने अंमलबजावणी करण्याचे सूचविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com