Apple Farming : आता दुष्काळी माळरानावरही सफरचंदाची लागवड शक्य

Apples Cultivation In Maharashtra : पंजाबमधील कृषि विज्ञान केंद्र पठाणकोटने सफरचंदाच्या लागवडीचा प्रयोग केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. आता पंजाब, बिहार, राजस्थान आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांमधील शेतकरी पारंपारिक पिकांसोबत सफरचंदाची शेती करू शकतात.
Apple Farming
Apple Farmingagrowon
Published on
Updated on

Apple Farming In Maharashtra : सफरचंद म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर दिसतात त्या बर्फाळ काश्मीरमधील सफरचंदाची सुंदर बाग. पण आता पंजाब, राजस्थान, महाराष्ट्रासारख्या राज्यातही सफरचंदाच्या बहरणार आहेत.  

पंजाब कृषी विद्यापीठाने नुकत्याच सफरचंदाच्या दोन जाती विकसित केल्या आहेत. त्यांची लागवड उष्ण प्रदेशातही लागवड करता येणार आहे.

Apple Farming
सफरचंद झाडाला फळधारणा ! नाशिकच्या शेतकऱ्याचा लागवडीचा प्रयोग

भारतात जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या सारख्या थंड हवामानाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात सफरचंदाची शेती केली जाते. विशेषतः ज्या ठिकाणी बर्फवृष्ठी होत असते अशाच ठिकाणी सफरचंदाचे उत्पादन घेतले जात होते. पण आता उष्ण प्रदेशातही सफरचंदाचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. पंजाबच्या कृषि विज्ञान केंद्र पठाणकोट यांनी सफरचंदाच्या शेताचा प्रयोग यशस्वी करू दाखवला आहे. आता हे कृषी विज्ञान केंद्र सफरचंदाची शेती करण्यासाठी जनजागृती करणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागवड व संगोपन करण्यासाठी आवश्यकते प्रशिक्षणही देणार आहे.

पंजाब कृषी विद्यापीठाने सफरचंदाच्या अन्ना आणि डोर्सेट गोल्डन या दोन सफरचंदाच्या जाती विकसित केल्या आहेत. त्यांची उष्ण प्रदेशातही लागवड करता येईल. पंजाब कृषी विद्यापीठातील  शास्त्रज्ञांनी  9 वर्षांच्या संशोधन आणि चाचणीनंतरया दोन्ही जाती विकसित केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे  या जाती 35 ते 37 अंशांपर्यंत तापमान सहन करू शकतात.

Apple Farming
देशातील सफरचंद उत्पादन वाढणार

शेतकरी या दोन्ही जातींची लागवड  जानेवारी महिन्यात करू शकतात, असे कृषी शास्त्रज्ञ सांगतात. त्याचबरोबर मार्च ते जून दरम्यान हलके सिंचन करावे लागेल. तीन वर्षांनंतर मे महिन्यात तुम्ही त्यातून उत्पन्न मिळवू शकता. त्याची काढणी जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करावी. सफरचंद म्हटले की आपल्याला शिमला, जम्मू काश्मीर आठवते. परंतु, महाराष्ट्रात देखील सफरचंदाची शेती करता येऊ शकेल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. 

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सफरचंज शेतीचे प्रयोग करण्यात आले. परंतु त्यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली. शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना सफरचंदाची रोपे विकणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे सफरचंद शेतीबद्दल राज्यात नकारात्मक वातवारण तयार झाले आहे. परंतु पंजाब कृषी विद्यापीठाच्या संशोधनामुळे हे चित्र बदलण्यास मदत होऊ शकते. 

अर्थात, राज्यात लगेच मोठ्या प्रमाणावर सफरचंद शेती सुरू होईल, अशातला भाग नाही. परंतु ताज्या संशोधनामुळे सफरचंदाचे पीक घेण्यासंदर्भात काही शक्यता खुल्या झाल्या आहेत, असे जाणकारांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com