MAGNET Project : ‘मॅग्नेट’ उपप्रकल्पांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Agriculture Project : महाराष्ट्र ग्रो बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत राज्यातील लाभार्थ्यांकडून मॅग्नेट प्रकल्पांमध्ये समाविष्ट असणाऱ्या पिकांसंबंधी काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्यसाखळी विकास आदी बाबतच्या उपप्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
MAGNET Project
MAGNET ProjectAgrowon
Published on
Updated on

Nanded News : महाराष्ट्र ग्रो बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत राज्यातील लाभार्थ्यांकडून मॅग्नेट प्रकल्पांमध्ये समाविष्ट असणाऱ्या पिकांसंबंधी काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्यसाखळी विकास आदी बाबतच्या उपप्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करून ता. १० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर ग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचे विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे यांनी केले आहे.

पात्र लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था कंपनी कायदा व सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या शेतकरी संस्था, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोक संचलित साधन केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार शेतकरी उत्पादक कंपनी नसलेल्या मात्र कोणत्याही फलोत्पादन पिकांच्या उत्पादकाबरोबर तसेच उत्पादकांच्या सहकारी संस्था, निर्यातदार मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था, कृषी तंत्र किंवा आर्थिक तंत्र संस्था याचा समावेश आहे.

MAGNET Project
MAGNET : ‘मॅग्नेट’च्या दुसऱ्या टप्प्यात शेतीमालाच्या प्रक्रियेला स्थान

शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणूकदार या लाभार्थ्यांसाठी राहणार असून पात्र अर्जाचे मूल्यांकन करून मूल्यांकन निकषानुसार पहिल्या ७० लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या अधिकतम ६० टक्केपर्यंत अर्थसाहाय्य देय राहील.

MAGNET Project
Magnet Fund : ‘मॅग्नेट’ला ४८ कोटींचा निधी दोन टप्प्यात १०० कोटी निधी जमा

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता निकष, विहित नमुन्यातील अर्ज, मूल्यांकन निकष, कागदपत्रांची चेकलिस्ट इ. माहिती कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विभागीय प्रकल्प सहायक गजेंद्र नवघरे, (प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, मॅग्नेट प्रकल्प, लातूर) व विभागीय प्रकल्प व्यवस्थापक गणेश पाटील (मॅग्नेट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, मॅग्नेट प्रकल्प लातूर) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविले आहे.

संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक

मग्नेट प्रकल्पात केळी, पेरू, डाळिंब, चिकू, सीताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची व फुलपिके, आंबा, लिंबू, काजू व पडवळ या पिकांसंबंधी काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्यसाखळी विकास आदी बाबत उपप्रकल्प राबविण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी संकेतस्थळावर नोंदणी करून विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रांची चेकलिस्ट डाऊनलोड करावी.

अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत मॅग्नेट प्रकल्पाच्या संबंधित प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पीआययु) तथा राज्य कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय, लातूर येथे छापील प्रतीत विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com