Magnet Fund : ‘मॅग्नेट’ला ४८ कोटींचा निधी दोन टप्प्यात १०० कोटी निधी जमा

३५ प्रकल्पांना मान्यता
Magnet Fund
Magnet Fund Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः शेतीमधील मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी आशियायी विकास बॅंकेच्या (Asian Development Bank) सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (Maharashtra Agribusiness Network project ) (मॅग्नेट) (Magnet) प्रकल्पास दुसऱ्या टप्प्यातील ४८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी नुकताच वितरित करण्यात आला आहे.

यामुळे आता या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटींचा निधी वितरित झाला असून, या निधीतून आतापर्यंत ३५ प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालक दीपक शिंदे यांनी दिली.
आशियायी विकास बॅंकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये मूल्यसाखळी विकसित करण्यात येत आहे.

Magnet Fund
‘मॅग्नेट’ला मिळणार गती;५१ कोटींचा निधी जमा

या प्रकल्पासाठी राज्य शासन आणि आशियायी विकास बॅंकेद्वारे १ हजार कोटींच्या निधीची मंजुरी आहे. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे निधी रखडला होता. मात्र आता हा निधी वितरणास सुरुवात झाली असून, ऑगस्ट २०२२ मध्ये ५० कोटींचा तर २० मार्च २०२३ रोजी ४८ कोटी १८ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या प्रकल्पांअंतर्गत ११ फलोत्पादन पिकांच्या मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी २३० कोटींच्या प्रकल्पांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

अशी होणार मूल्यसाखळी विकसित
शेतीमालाच्या काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाअभावी होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी पॅकहाऊस, प्रतवारी केंद्र, रायपनिंग चेंबर, शितगृह, रेफर व्हॅन, फळे भाजीपाला निर्लजीकरण तंत्रज्ञान, निर्यात सुविधा आदी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, भेंडी, मिरची (लाल आणि हिरवी) व फुले आदी ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com