Apmc Voting Update : पाच जिल्ह्यांतील २४ बाजार समित्यांसाठी शांततेत मतदान, उमेदवारांचे निकालाकडे लक्ष

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या पाच जिल्ह्यांतील २४ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले.
Apmc Voting Update
Apmc Voting UpdateAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या पाच जिल्ह्यांतील २४ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले. सकाळच्या सत्रात अनेक ठिकाणी संत असलेली मतदानाची गती १० वाजेनंतर वाढायला सुरुवात झाली.

संध्याकाळी चार वाजेपर्यंत अपवाद वगळता सर्वच ठिकाणी ९० टक्के मतदान झाल्याची सहकार विभागाची माहिती.

बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मराठवाड्यातील तब्बल ५९ बाजार समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या बाजार समित्यांपैकी १४ बाजार समितीच्या निवडणुका त्या बाजार समित्यांना निवडणूक खर्च झेपत नसल्याने रद्द करण्यात आल्या होत्या.

निवडणूक जाहीर झालेल्या पाच जिल्ह्यांतील २४ बाजार समित्यांसाठी २८ एप्रिलला मतदान प्रक्रिया सुरू होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर ९५.२९%, कन्नड ९६.९३%, वैजापूर ९८.८४% तर लासुर स्टेशन ९७.५१% मतदान झाले.

सायंकाळी चार वाजेपर्यंत संभाजीनगर ३३७६ पैकी ३२९७ मतदारांनी, कन्नड ३०२० पैकी २९०३ मतदारांनी, वैजापूर ३०३० मतदारांपैकी २९९५ मतदारांनी तर लासुर स्टेशन १५२९ मतदारांपैकी १४९१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

Apmc Voting Update
Pune APMC Election : पुणे बाजार समितीसाठी ६७.८२ टक्के मतदान

जालना जिल्ह्यातील घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समिती साठी सायंकाळी चार वाजेपर्यंत ९५. ५० टक्के मतदान झाले तर परतूर बाजार समितीसाठी ९५.३२% मतदान झाले घनसावंगी बाजार समितीत २१३१ मतदारांपैकी २०३५ मतदारांनी मतदान केले दुसरीकडे परतूर बाजार समितीत १००४ मतदारांपैकी ९५७ मतदारांनी मतदान केले.

सायंकाळी चार वाजेपर्यंत बीड जिल्ह्यातील बीड बाजार समितीमध्ये ९७.९५% अंबाजोगाई ९२.७४% परळी ९७.५०% केज ९८.३५% गेवराई ९३.७२% तर वडवणी बाजार समिती साठी ९९.१९% मतदान झाले होते जिल्ह्यातील १४९६१ मतदारांपैकी १४,३२८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव बाजार समिती साठी ९५.४८%, तुळजापूर ९८.८%, उमरगा ९६.८०%, मुरूम ९८.६९%, भूम ९७.८९%, परांडा ९८.७१%, कळंब ९५.५५%, तर वाशी बाजार समितीसाठी ९५.२७% मतदान झाले. जिल्ह्यातील १३५८१ मतदारांपैकी १३१४७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

लातूर जिल्ह्यातील लातूर बाजार समितीसाठी ९१.०९ टक्के, औसा ९४.५४ टक्के, चाकूर ९८.१६ टक्के, उदगीर ९०.३९ टक्के मतदान झाले. निवडणूक होत असलेल्या बाजार समित्यांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध पक्षांच्या आजी-माजी आमदार खासदार व राजकारण्यांनी मतदान केंद्रांच्या आसपास ठाण मांडले होते.

मतदारांना आपल्या पॅनेलची भूमिका पटवून देण्यासाठी गत काही दिवसांतील प्रचारात सर्वांनीच सर्वच प्रकारे प्रयत्न केल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपली मत टाकून सत्तेची चावी दिली हे मतमोजणी अंतिम स्पष्ट होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com