New Parliament : नवीन संसद भवनाचा आणखी एक मुहूर्त टळला

नवीन संसद भवनात अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या इच्छेची यंदाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पूर्तता होण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे.
New Parliament
New ParliamentAgrowon

नवी दिल्ली ः नवीन संसद भवनात (New Parliament Building) अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या इच्छेची यंदाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात (Budget Session) पूर्तता होण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. कारण अधिवेशनाचा प्रारंभबिंदू असलेले राष्ट्रपतींचे अभिभाषण सध्याच्याच ऐतिहासिक व गोलाकार संसद भवनात होईल, असे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.

New Parliament
Narendra Modi : संधींचा लाभ घेण्यासाठी चौकटी बाहेरचा विचार करा ः मोदी

संसद अधिवेशनाचा पूर्वरंग ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत चालेल. महिनाभराच्या मध्यंतरानंतर अधिवेशन १३ मार्चला पुन्हा सुरू होणार असून ते ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. ते नवीन संसदेत चालण्याची शक्यता नाही.

दरम्यान संपूर्ण सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाच्या वेबसाइटवरून शुक्रवारी (ता. २०) नवीन संसद भवनाची काही मूळ छायाचित्रे नुकतीच काढून टाकण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव असे करण्यात आल्याचे सांगितले गेले.

New Parliament
Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन

सध्याचे संसद भवन ९५ वर्षांपूर्वी १९२७ मध्ये बांधले गेले होते. जुनी गोलाकार इमारत जास्त वापरण्यात आली आहे आणि ती दिवसेंदिवस जास्तीत जास्त खराब होत आहे, असे मार्च २०२० मध्ये सरकारने संसदेला सांगितले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्यमान इमारतीतच संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील, असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नुकतेच जाहीर केले आणि नवीन इमारतीत हे अधिवेशन होऊ शकते याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाचे भूमीपूजन केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com