Team Agrowon
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते विविध विकास कामांचे गुरुवारी (ता.१९) लोकार्पण करण्यात आले.
त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई मेट्रो (Mumbai Metro) २ व ७ तसेच दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) रुग्णालय, रस्ते, छत्रपती शिवाजी महाराज टर्निमल आणि पीएम स्व निधी अशा विविध कामांचे उद्घाटन मोदी यांनी केले.
यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या हस्ते मुंबईत तब्बल ३८ हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन झाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले, शिंदे-भाजपा सरकारवर जनतेला विश्वास आहे.
हे सरकार जनतेच्या पायाभूत सुविधांवर भर देईल. तसेच २०१४ पर्यंत मुंबईत फक्त ११ किलोमीटरपर्यंत मेट्रो होती.