Wrestling : अंजनगावच्या पैलवानाकडून परदेशात भारताचे नेतृत्व
पथ्रोट, जि. अमरावती : येथील ग्रामविकास अधिकारी पुरुषोत्तम कोकाटे यांचा मुलगा हर्षवर्धन कोकाटे याने स्पेन येथे झालेल्या ग्रापलिंग कुस्ती (Wrestling Competation) स्पर्धेत भारताचे नेतृत्व करून ग्रामीण भागाची मान उंचावली आहे.
अंजनगावसुर्जी येथील सीताबाई संगई विद्यालयात आठवीत शिक्षण घेत असताना हर्षवर्धनला खेळाप्रती असलेली आवड वस्ताद हेमंत माकोडे यांनी हेरले. कुस्तीविषयी त्याच्यात आत्मविश्वास जागृत करून सूर्यवंशी तालमीत त्याच्याकडून सराव करून घेतला.
त्यानंतर हर्षवर्धन याने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. त्यानंतर अपघातात वीस फूट दरीत पडल्याने गंभीर जखमी झालेल्या हर्षवर्धन याला मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यातून सावरण्यात तीन वर्षांचा काळ लोटला.
अभियंत्याची पदवी मिळवल्यानंतर कोरोना काळात घरी आलेल्या हर्षवर्धनने माकोडे यांच्या मार्गदर्शनात पुन्हा सराव सुरू केला. दरम्यान, पानिपत येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा झाली. येथेही बाजी मारत हर्षवर्धन याने पुन्हा सुवर्ण पदक जिंकले.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय ग्रापलिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. ११ ऑक्टोबर रोजी चार खेळाडूंसह भारताबाहेर स्पेन देशात (युरोप खंडात) जाण्याची संधी त्याला मिळाली. या स्पर्धेमध्ये हर्षवर्धनने भारताचे नेतृत्व केले. त्याठिकाणी फ्रान्स सोबत लढत जिंकून उपांत्यपूर्वपर्यंतची फेरी गाठली. त्यामुळे गावकऱ्यांची मान संपूर्ण देशात उंचावली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.