Dairy Industry : डेअरी उद्योगाच्या राजधानीवर अमूलचे निर्विवाद वर्चस्व

राज्याच्या डेअरी उद्योगातील आर्थिक उलाढालीची राजधानी समजली जाणाऱ्या मुंबईची बाजारपेठ निर्विवादपणे आता अमूलच्या ताब्यात गेली आहे.
Dairy Industry
Dairy Industry Agrowon
Published on
Updated on

Dairy Industry Update पुणे ः राज्याच्या डेअरी उद्योगातील (Dairy Business) आर्थिक उलाढालीची राजधानी समजली जाणाऱ्या मुंबईची बाजारपेठ निर्विवादपणे आता अमूलच्या (Amul Dairy) ताब्यात गेली आहे. महानंद कुचकामी ठरल्यामुळेच परराज्यातील डेअरींनी स्थानिक बाजारपेठ ताब्यात घेतल्याचे डेअरी उद्योगातील (Dairy Industry) जाणकारांचे म्हणणे आहे.

मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून डेअरी उद्योगाचेही प्रमुख केंद्र समजले जाते. राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून रोज दीड कोटी लिटरपेक्षाही जास्त दूध उत्पादित केले जाते.

त्यापैकी मुंबईची बाजारपेठ दररोज अंदाजे ५५ लाख लिटर दुधाची खरेदी करते. मुंबईत काही वर्षांपूर्वी महानंदचा दमदार विस्तार सुरू होता.

मात्र, ‘अमूल’प्रमाणे दर्जेदार व्यावसायिक सहकारी यंत्रणा न होता महानंदचे व्यवस्थापन सतत गैरव्यवहार आणि राजकारणात फसत गेले. त्यामुळे आता अवघे ८० हजार लिटरची बाजारपेठ महानंदकडे उरली आहे.

या उलट अमूलकडे ३० टक्क्यांच्या आसपास हिस्सा गेला आहे. सध्या अमूलकडून मुंबईच्या बाजारात दररोज १६ लाख लिटर दूध विकले जाते आहे.

Dairy Industry
Dairy Business : दुग्ध व्यवसाय पूरक नव्हे, मुख्य व्यवसाय म्हणून करा

परराज्यातील नंदिनीने आता अडीच लाख लिटरपेक्षा जास्त तर मदर डेअरीनेदेखील दोन लाख लिटरची बाजारपेठ ताब्यात घेतली आहे. वारणा, गोविंद, गोवर्धन या डेअरींनीही हळूहळू विस्तार चालू ठेवला आहे.

दुधाच्या बाजारात आता अमूल वगळता सर्वत्र खासगी डेअरीचालकांचे वर्चस्व तयार होत असताना कोल्हापूरचा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ मात्र आश्चर्यकारकपणे मुंबईत घौडदौड करतो आहे. स्पर्धा असूनही गोकुळकडून सध्या मुंबईत रोज ८ लाख लिटर दुधाची विक्री केली जाते. हा हिस्सा १५ टक्क्यांच्या आसपास आहे.

Dairy Industry
Dairy Production : परिश्रमातून विस्तारतोय ‘नर्मदाई’ ब्रॅण्ड

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील महानंदची बाजारपेठ पूर्णतः अमूलने ताब्यात घेतली आहे. गोकुळ या स्पर्धेत टिकून राहिला कारण दर्जा आणि वेळेवर पुरेसा पुरवठा यात गोकुळने खंड पडू दिलेला नाही.

विशेष म्हणजे अमूलकडून जंगजंग पछाडूनदेखील मुंबईच्या बाजारपेठेतून गोकुळला हलवता आलेले नाही.

कर्नाटकातून येऊन मुंबईत जम बसवणाऱ्या नंदिनीचा सध्याचा वाटा केवळ दोन लाख लिटरचा असला तरी तो दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. कारण, नंदिनी खूप वेगाने मुसंडी मारत आहे.

मुंबईच्या बाजारपेठेत क्षमता असूनही महानंदने व्यावसायिक धोरण ठेवले नाही व स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. कोल्हापूर भागातील भौगोलिक स्थितीमुळे म्हशीच्या दुधाला वेगळा गंध, चव आहे. त्याचा फायदा मात्र गोकुळला होतो. गुणवत्ता, चव आणि व्यवस्थापनात गोकुळने सातत्य राखले. त्यामुळे गोकुळला मुंबईत अमूल नमवू शकला नाही. आता तर अमूलनेच कोल्हापूरला मोठा प्रकल्प उभारण्याची तयारी चालू केली आहे.

- चेतन नरके, संचालक, इंडियन डेअरी असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com