विषमुक्त भाजीपाल्याचा अमेझॉन करणार पुरवठा

अमेझॉन मागील दोन वर्षापासून शेतमाल विपननात (Agriculture Marketing) काम करत आहे. ग्राहकाला अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विषमुक्त भाजीपाला (toxin-free vegetables) पुरवठा करत आहे.
toxin-free vegetables
toxin-free vegetablesAgrowon
Published on
Updated on

पुणे : नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र आणि अमेझॉन इंडिया रिटेल यांच्यात अन्न सुरक्षा, दर्जात्मक शेतमाल उत्पादन (Quality Agriculture Products) आणि विपणनाबाबत (Marketing) तांत्रिक मार्गदर्शन प्रात्यक्षिके आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण विषयीचा द्विस्तरीय सामंजस्य करार झाला. ‘‘अधिकाधिक दर्जात्मक उत्पादनात वाढ करणे आणि देशांतर्गत बाजारठेत उत्पादित शेतमालाची अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून विक्री करणे, या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला,’’ अशी माहिती केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिली.

या वेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ राहुल घाडगे, योगेश यादव, डॉ. दत्तात्रेय गावडे, धनेश पडवळ, अ‍मेझॉनचे कंपलायन्स विभागातील प्रमुख पराग भौमिक, अन्न सुरक्षा विभागाचे प्रमुख अभितोष कुमार, डॉ. शशीन शोभणे, तेजस जाधव आदि उपस्थित होते.

toxin-free vegetables
Sanjay Raut :नऊ तासांच्या चौकशीनंतर राऊत ईडीच्या ताब्यात

‘‘अमेझॉन मागील दोन वर्षापासून शेतमाल विपननात (Agriculture Marketing) काम करत आहे. ग्राहकाला अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विषमुक्त भाजीपाला (toxin-free vegetables) पुरवठा करत आहे.

या कराराद्वारे जुन्नर-आंबेगाव भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठेत संधी निर्माण करता येईल. या प्रकल्पांतर्गत कृषी विज्ञान केंद्र आणि अमेझॉन संयुक्तिकरित्या टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, दुधी भोपळा, कारली, मिरची, वांगी, काकडी, भेंडी आदी पिकांची प्रात्यक्षिके शेतावर राबवतील,’’ अशी माहिती मेहेर यांनी दिली.

toxin-free vegetables
Kharif Sowing : भात लागवड क्षेत्रात १३ टक्क्यांची घट

डॉ. शोभणे म्हणाले, ‘‘हा प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्या सोबत राबविणार होतो. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी भारतातील एका कृषी विज्ञान केंद्रासोबत प्रकल्प राबविण्यासाठी सूचीत केले. दरम्यान महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प राबविण्याचे ठरविले. सर्वप्रथम नारायणगाव केव्हीकेचे नाव ठरविले.’’

कुमार म्हणाले, ‘‘या प्रकल्पाचा फायदा शेतमालाच्या दर्जात्मक उत्पादनासाठी आणि विक्रीसाठी निश्चित होईल. अमेझॉन कंपनी अन्न सुरक्षेतेच्या (Food Security) बाबतीत खूप जागरूक आहे. ग्राहकाला ताजा भाजीपाला (Fresh Vegetables) वेळेत पोहोचविण्यासाठी या भागात भाजीपाला संकलन केंद्र मागील दोन वर्षापासून सुरू केले आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर तो देशभर राबविला जाईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com