
Pune News : जुन्नर तालुक्यातील जनतेच्या हक्काचे पाणी नगर आणि सोलापूरला सोडल्यास भविष्यकाळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जुन्नर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी रविवारी (ता. १४) दिला. कुकडी प्रकल्पाच्या पाणीप्रश्नासाठी जुन्नर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकजूट होऊन जुन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कुकडी प्रकल्पातील सद्यःस्थितीतील पाणीसाठ्याबाबत योग्य माहिती न देता त्यांची सही घेऊन आवर्तन सोडण्याबाबतचा आदेश काढल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
माणिकडोह धरणात सद्यःस्थितीत १२०० एमसेफ्टी इतका पाणीसाठा शिल्लक असून त्यापैकी ८८० एमसेफ्टी इतका साठा सोडण्यात येणार आहे. वडज धरणातून ५० एमसेफ्टी तर पिंपळगाव जोगा धरणातील मृत साठा मोठ्या प्रमाणात काढणार आहे.
तर माणिकडोह धरणातून रविवारी (ता १४) रात्रीच्या सुमारास आवर्तन सुरु करण्यात येणार असल्याने भविष्यात जुन्नरवासियांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार असल्याने आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ॲड. संजय काळे म्हणाले, ‘‘जुन्नर तालुक्यातील शेतकरी व रहिवासी यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे.
वडज धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला आहे, तो काढावा. हेकेखोरपणाने जुन्नर तालुक्यातील नागरिकांच्या हक्काचे पाणी नेण्याचा प्रयत्न करून अन्याय केल्यास तालुक्यातील जनता शांत बसणार नाही.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.