MSP : शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे : रघुनाथदादा पाटील

शेतीमालाला हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे. त्यामुळे हमीभाव मिळालाच पाहिजे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शासनास केले आहे.
Raghunath Dada Patil
Raghunath Dada PatilAgrowon
Published on
Updated on

ओतूर, ता. जुन्नर ः ‘‘सध्या उसाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. उसाला श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने (Shree Vighnahar Sugar Mill) चार हजार पाचशे रुपये दर द्यावा. तसेच शेतीमालाला हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे. त्यामुळे हमीभाव मिळालाच पाहिजे,’’ असे आवाहन शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथदादा पाटील (Raghunath Dada Patil) यांनी शासनास केले आहे.

Raghunath Dada Patil
Sugar Mill : श्री दत्त कारखाना एकरकमी एफआरपी देणार

ओतूर (ता. जुन्नर) येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुभश्री लॉन्समध्ये ‘कांदा व ऊस परिषद’ शेतकरी संघटनेतर्फे आयोजित केली होती. परिषदेच्या अध्यक्षस्थानी पाटील हे होते.

Raghunath Dada Patil
Sugar Mill : ‘पांडुरंग’ची गाळप क्षमता प्रतिदिन दहा हजार टनापर्यंत वाढवणार

या वेळी कांद्यावरील निर्यात बंदी कायमची उठवली पाहिजे, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे कांद्याला ३० रुपये भाव मिळाला पाहिजे, दोन साखर कारखान्यातील हवाई अंतर अट रद्द करावी, शासनाने दोन कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकावी, सी. रंगराजन समितीप्रमाणे शेतकऱ्यांना ७०/३० टक्के प्रमाणे उसाचे पैसे मिळावेत.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होऊन सातबारा कोरा करावा. जुन्नर तालुक्यात ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा. या प्रमुख मागण्या परिषदेत मांडण्यात आल्या. शेतकरी नेते लक्ष्मण शिंदे यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. तसेच युवा आघाडी अध्यक्ष जुन्नर प्रमोद खांडगे पाटील यांनी जुन्नर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर व धोरणावर टीका केली.

या वेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजी नानखिले, बाळासाहेब घाडगे, जुन्नर तालुका अध्यक्ष संजय भुजबळ, पुणे जिल्हा युवा अध्यक्ष बाबा हरगुडे यांनी ही मनोगत व्यक्त करून शेतकऱ्याची व्यथा मांडली. सूत्रसंचालन युवा आघाडी महिला अध्यक्ष वर्षा शांताराम गुंजाळ यांनी केले. तर अजित वाघ यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com