PDKV Akola : तंत्रज्ञान निर्मिती, विक्रीबाबत ‘पंदेकृवि’चा यंत्र निर्मात्यांसोबत करार

Agricultural Processing Machinery : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून विकसित कृषी प्रक्रिया यंत्रे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावीत, या हेतूने विद्यापीठ व यंत्र निर्मात्यांमध्ये निर्मिती व विक्रीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.
PDKV Akola
PDKV AkolaAgrowon
Published on
Updated on

Technology creation : अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून विकसित कृषी प्रक्रिया यंत्रे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावीत, या हेतूने विद्यापीठ व यंत्र निर्मात्यांमध्ये निर्मिती व विक्रीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.

कुलगुरू डॉ. एस. जी. गडाख यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या कापणी पश्‍चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान व कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने विविध प्रक्रिया यंत्रे विकसित केली आहेत. प्रामुख्याने दाळमिल, सफाई यंत्र, धान्य ड्रायर, भाजीपाला बीज निष्कासन यंत्र, सीताफळ गर निष्कासन यंत्र, जांभूळ गर निष्कासन यंत्र, हुरडा काढणी यंत्र, चारोळी फोडणी यंत्राचा त्यात समावेश आहे. या करारावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, डॉ. डी. बी. उंदीरवाडे, डॉ. एस. एस. माने, डॉ. एस. आर. काळबांडे, प्रमोद पाटील, कृषी प्रक्रिया व संशोधन अभियंता विभाग प्रमुख डॉ. पी. एच. बकाणे उपस्थित होते. या वेळी धनंजय अॅग्रो (अकोला), मे. व्ही. के. मॅन्युफॅक्चरिंग (परभणी) आणि मॉ दुर्गा प्लॅस्टिक प्रॉडक्ट्स (अकोला) यांचे प्रतिनिधी उपस्थित होती.

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘कृषी अभियांत्रिकी विभागाचा यांत्रिकीकरणात मोठा सहभाग आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्री-सूत्री पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये पहिले सूत्र उन्नत वाण व चांगले व्यवस्थापन करून उत्पादकता वाढविणे, यांत्रिकीकरणामुळे उत्पादन खर्च कमी करणे हे दुसरे सूत्र आणि तिसरे सूत्र म्हणजे योग्य वेळी कापणी, चांगले विपणन, किमान प्रक्रिया व पॅकेजिंग करणे.

PDKV Akola
PDKV Akola : कापूस, ज्वारी, सोयाबीनसाठी ‘पंदेकृवि’कडून शिफारशी जाहीर

कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागामार्फत निर्मित विविध यंत्रे, राज्य व देशपातळीवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांचा उत्पन्नवाढीमध्ये सहभाग आहे. यंत्र निर्मात्यांनी यंत्रे विक्रीनंतरही शेतकऱ्यांना चांगली सेवा तसेच यंत्रांचा दर्जा राखावा. वाजवी दरात ती उपलब्ध करून द्यावीत.’’ डॉ. खर्चे यांनी कृषी अभियांत्रिकी विभागामार्फत ५२ यंत्रे विकसित करण्यात आल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com