Agriculture Management : सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्था आणि ‘सारथी’मध्ये करार

तरुण शेती क्षेत्राकडे आकर्षित होऊन, व्यावसायिक शेतीतून उद्योजक व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय काढणीपश्‍चात तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेद्वारे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात.
Post Harvest Technology
Post Harvest TechnologyAgrowon
Published on
Updated on

पुणे : तरुण शेती क्षेत्राकडे (Agriculture Sector) आकर्षित होऊन, व्यावसायिक शेतीतून (Commercial Agriculture) उद्योजक व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय काढणीपश्‍चात तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेद्वारे (Post Harvesting Technology Training Institute) विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त उपयोग शेतकऱ्यांच्या मुलांना व्हावा, यासाठी संस्थेच्या वतीने ‘सारथी’ (SARATHI) सोबत सामंज्यस्य करार करण्यात आला आहे.

Post Harvest Technology
Crop Harvesting : कापणी प्रयोगातील मजुरी वाढविली

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आणि राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने डॉ. भास्कर पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी सारथीच्या प्रकल्प संचालक रोहिणी भोसले, राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचे व्यवस्थापक विश्‍वास जाधव उपस्थित होते.

Post Harvest Technology
Agriculture Electricity : कृषिपंपासाठी आठ तास वीज द्या

या प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या गटातील, समाजातील व्यक्तींना होणार आहे. ‘सारथी’ने राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेस या संदर्भात कार्यारंभ आदेश दिला आहे. सुरुवातीस एकूण दहा प्रशिक्षण कार्यक्रमास मान्यता दिली आहे.

फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षणांतर्गत हरितगृह व्यवस्थापन, शेडनेट हाउस तंत्रज्ञान, रोपांची अभिवृद्धी व भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन, पीकनिहाय अभ्यासक्रम, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, पीकनिहाय अभ्यासक्रम - रंगीत ढोबळी मिरची, चेरी टोमॅटो, काकडी तर फलोत्पादन व्यवस्थापन प्रशिक्षणांतर्गत लॅण्डस्केपिंग व्यवस्थापन, उतिसंवर्धन तंत्रज्ञान, फ्लॉवर अरेंजमेंट, ड्राय फ्लॉवर आदी कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.

अर्जासाठी लवकरच ऑनलाइन सुविधा

सामंजस्य करार ३ वर्षांसाठी असून यासाठी उमेदवाराची पात्रता, अटी व कागदपत्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. या अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, अर्ज करण्यासाठीची ऑनलाइन सुविधा लवकरच राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com