रस्ता सुरू केल्यानंतर आदिवासी बांधवांचे आंदोलन मागे

चास-ठाकरवाडी (ता. आंबेगाव) येथील आदिवासी ठाकर समाजातील नागरिकांनी रस्त्यासाठी भर पावसात घोडेगाव तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते.
Tribal Protest
Tribal Protest Agrowon
Published on
Updated on

महाळुंगे पडवळ, जि. पुणे ः चास-ठाकरवाडी (ता. आंबेगाव) येथील आदिवासी ठाकर समाजातील नागरिकांनी रस्त्यासाठी भर पावसात घोडेगाव तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन बंद केलेला रस्ता सुरू केल्यानंतर आदिवासी ठाकर बांधवांनी सुरू केलेले बेमुदत मुक्कामी धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Tribal Protest
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

ठाकरवाडीपासून एक किलोमीटर अंतरात माचीचीवाडी (कोंबडवाडी) आहे. या वस्तीकडे जाण्यासाठी खासगी मालकाच्या जमिनीतून पाऊलवाट होती. या मालकाने शेतजमिनीत पेरणी केल्यामुळे ही पाऊलवाट बंद झाली होती. त्यामुळे आदिवासी नागरिकांचे दळणवळण, शाळा, बाजार, दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालयात ये-जा करणे बंद झाले होते. रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर गुरुवार (ता.७)पासून मुक्काम आंदोलन करण्याची भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली. त्यानुसार नागरिक व शाळकरी मुले भर पावसात या आंदोलनात सहभागी झाली होती. आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे डॉ. संजय दाभाडे व शेतमजूर युनियनचे डॉ. ज्ञानेश्‍वर मोटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पुणे यांची भेट घेऊन सदरील आदिवासी बांधवांना न्याय देण्याची मागणी केली.

Tribal Protest
Kharif Sowing : धूळवाफेवर पेरणी केलेली पिके धोक्यात

या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे व किसान सभेचे नेते राजू घोडे, आदिवासी ठाकर समन्वय समितीचे अर्जुन काळे, अविनाश गवारी, शारदा केदारी, लालाजी पारधी, रत्नाबाई पारधी, शेतमजूर युनियनचे सुभाष पारधी, ज्योती पारधी यांनी केले.

या आंदोलनाची दखल घेत प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांनी आदिवासी विकास विभागाचे योगेश खंदारे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देविदास दरेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य खंडू पारधी, सरपंच बबन बारवे, उपसरपंच जालिंदर काळे, पोलिस पाटील वैभव शेगर, ग्रामसेवक रमेश काळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे संबंधित जमीन मालकांशी चर्चा करून रस्ता मोकळा करून देण्यास सांगितले. त्यानुसार मालकाने रस्ता मोकळा करून दिला. वस्तीला कायमस्वरूपी रस्ता होत नाही, तोपर्यंत पाऊलवाट बंद होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे लेखी पत्र प्रशासनाच्या वतीने देण्यात आले, त्यानंतर आदिवासी ठाकर बांधवांनी मुक्कामी धरणे आंदोलन मागे घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com