Agriculture
Agriculture Agrowon

Kharif Season 2023 : चार कृषी सेवा केंद्रावर कारवाई

Cotton Seed : सर्वत्र एक जून पासून कपाशी बियाणे विक्रीला सुरवात करण्यात आली आहे. परंतु काही कृषी केंद्र काही कपाशी बियाण्याची नियमबाह्य विक्री करत असल्याचे फुलंब्री येथील भरारी पथकाला तपासणी दरम्यान दिसून आले.
Published on

Latest Agriculture News : संबंधित कंपनीकडून बियाणे विक्रीची परवानगी घेतली नसताना ते बियाणे विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी चार दुकानावर कृषी विभागाच्या पथकाने बियाणे विक्री बंद करण्याची कारवाई केली, असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी शुक्रवारी (ता. २) दिली.

सर्वत्र एक जून पासून कपाशी बियाणे विक्रीला सुरवात करण्यात आली आहे. परंतु काही कृषी केंद्र काही कपाशी बियाण्याची नियमबाह्य विक्री करत असल्याचे फुलंब्री येथील भरारी पथकाला तपासणी दरम्यान दिसून आले. कृषी सेवा केंद्र ज्या परवान्यावर विक्री करत होते. त्या पाकिटाला परवानगी नव्हती.

Agriculture
Kharif Season : खरीप हंगामात पाण्याची मागणी वाढणार

त्यामुळे सदर बियाण्याचे कंपनीकडून कृषी केंद्राला विक्री करण्याची परवानगी नसतानाही सदर बियाणे पाकीट कृषी केंद्रावर आढळल्याने ही कारवाई चार कृषी सेवा केंद्रांवर करण्यात आली.

या दुकानांमध्ये बियाणे विक्री बंदचे आदेश तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी दिले. भरारी पथकात कृषी अधिकाऱ्यासह कृषी मंडलाधिकारी कृषी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Agriculture
Kharif Season 2023 : पेरणीची घाई नको

कृषी विभागाने दुकाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत वेगवेगळे पथक तैनात करण्यात आले आहेत. शहरातील तीन दुकानांमध्ये तपासणी दरम्यान कृषी विभागाची परवानगी नसणाऱ्या कापूस बियाण्याचे पॉकेट दिसून आल्याने कृषी विभागाच्या पथकाने नियमबाह्य बियाणे विक्री बंदची ही कारवाई केली आहे.

त्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने येणाऱ्या दिवसात ही कारवाई अजून कठोर करण्यात येईल असे निर्देश याद्वारे कृषी विभागाने सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना दिले आहे. तपासणी भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी भारत कासार, मंडळ कृषी अधिकारी निवृत्ती जोरी व कनिष्ठ लिपिक विखार शेख यांचा समावेश होता.

कृषी सेवा केंद्र चालकांनी परवानगी दिलेले बियाणे आपल्या दुकानात ठेवून शेतकऱ्यांना रीतसर विक्री करावे, अन्यथा येणाऱ्या काळात संबंधित दुकानावर कठोर कारवाई केली जाईल.
- भारत कासार, तालुका कृषी अधिकारी फुलंब्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com