Farmer CIBIL : ‘सीबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर कारवाई

Agriculture Credit : शेतकरी अगोदरच अवकाळी पावसाने बेजार झाला आहे. त्याला खरिपासाठी वेळेवर कर्ज बँकांनी द्यावे.
Indian Farmer
Indian FarmerAgrowon
Published on: 
Updated on: 

Jalgaon News : शेतकरी अगोदरच अवकाळी पावसाने बेजार झाला आहे. त्याला खरिपासाठी वेळेवर कर्ज बँकांनी द्यावे. पीक कर्जासाठी ‘सीबिल स्कोअर’ बँकांनी मागितला, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिला.

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक अजिंठा विश्रामगृहात झाली. तीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आमदार एकनाथराव खडसे, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे. खरिपासाठी उत्कृष्ट दर्जाचे बियाणे मिळावे. खते व पीककर्ज वेळेवर उपलब्ध होईल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे.

Indian Farmer
Farmer CIBIL : 'सीबिल'च्या विरोधात शेतकरी जागर मंचाचा मोर्चा

पालकमंत्री पाटील यांनी कापूस बियाणे मागणी व नियोजन, रासायनिक खतांचा वापर, प्रधानमंत्री पीकविमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना, नैसर्गिक आपत्तींसह विविध योजनांचा आढावा जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत घेतला. तालुका स्तरावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात, असे आमदार पाटील, आमदार खडसे यांनी सूचित केले.

Indian Farmer
Farmer CIBIL Score : पीककर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा नोंदवा

पावसाच्या अंदाजांची माहिती पुरवा...

शेतकऱ्यांनी १ जूननंतरच पेरणी करावी. खरीप हंगाम तोंडावर असताना, बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करावा, पावसाचे अंदाज, माहिती खेडोपाडी सर्वदूर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

पावसाचे अंदाज शेतकऱ्यांना वेळोवेळी कळत राहिले, तर दुबार पेरणीची वेळ किंवा इतरही नुकसान टळेल, असेही पालकमंत्री पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

२० कोटींची भरपाई...

मार्च २०२३ मध्ये झालेल्या अवकाळीचा जळगाव जिल्ह्यातील १८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने २० कोटी ४२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.