
Nagar Crime News : नगरग जिल्ह्यातील बहुचर्चित कोपर्डी लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणातील एका आरोपीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. जितेंद्र शिंदे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव असून कारागृहातील सेलमध्येच गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कारागृह प्रशानसनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या शिंदेचा मृतदेह कारागृह प्रशानसनाने पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
काय आहे कोपर्डी प्रकरण
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील तुकाई लवणवस्ती परिसरातील नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीची लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या करण्यात आली होती. पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती. मात्र, आजोबांच्या घरून मसाला घेऊन ती पुन्हा घरी परतत असताना आरोपी जितेंद्र शिंदेने तिला रस्त्यात अडवून रस्त्याच्या बाजूच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिची निर्घृण हत्या केली.
काही तासातचं आरोपी जेरबंद
कोपर्डी प्रकरणामुळे पुरोगामी महाराष्ट्र हादरला होता. संपूर्ण राज्यभरातून घटनेचे तीव्र पडसाद उमटत होते. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने सुत्र हलवत काही तासातच आरोपी जिंतेंद्र शिंदे याला श्रीगोंदा येथून ताब्यात घेत जेरबंद केले होते. तसेच या गंभीर गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या त्याच्या साथीदारांनाही चार दिवसांनी पोलिसांनी अटक केली होती.
या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी, पीडितेच्या मैत्रिणी, चुलत आजोबांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या होत्या. न्यायालयाने तीनही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून हे तिघेही येरवड्याच्या कारागृहात होते. धक्कादायक म्हणजे मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने खुनाचा आरोप अमान्य केला.
दरम्यान, प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदे यांने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींपैकी एक असणाऱ्या शिंदे याने कारागृहातच आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.